''दिलबहार'' ​अंतिम सामन्यात प्रवेश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

''दिलबहार'' ​अंतिम सामन्यात प्रवेश
''दिलबहार'' ​अंतिम सामन्यात प्रवेश

''दिलबहार'' ​अंतिम सामन्यात प्रवेश

sakal_logo
By

२१६५०
कोल्हापूर : सतेज चषक फुटबॉल स्पर्धेत शुक्रवारी दिलबहार विरुद्ध फुलेवाडी यांच्यात लढत झाली. सामन्यातील एक क्षण.

‘दिलबहार’ ​अंतिम फेरीत
​कोल्हापूर​, ता. १३ : दिलबहार तालीम ​मंडळाने आज सामन्याच्या उत्तरार्धात तीन गोल करत फुलेवाडी फुटबॉल ​क्लबवर विजय मिळवत अंतिम फेरी गाठली. सतेज चषक फुटबॉल ​स्पर्धेतील पाचवा साखळी सामना रोमहर्षक ठरला.
फुलेवाडीने​ सुरुवातीपासून आक्रमक खेळ करत प्रतिस्पर्धी संघावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. यात यशस्वी होत सामन्याच्या आठव्याच मिनिटाला मंगेश दिवसेने गोल नोंदवत संघाला ​१ - ० अशी ​आघाडी मिळवून दिली. ​यानंतर दिलबहारच्या खेळाडूंनी गोल नोंदवण्यासाठी केलेले प्रयत्न अयशस्वी झाले. फुलेवाडीचे आक्रमण परतून लावण्यात बचाव फळीला यश आले. उत्तरार्धात फुलेवाडी संघाने आक्रमक खेळ सुरू ठेवत प्रयत्न केले; मात्र दिलबहारच्या खेळाडूंनी अधिक आक्रमक पवित्रा घेत फुलेवाडीला झुंजवले. सातत्याने फुलेवाडीच्या गोल जाळीवर आक्रमण करणाऱ्या दिलबहारला यश येत नव्हते. सामन्याच्या ७२ व्या मिनिटाला राहुल तळेकरने ​संघासाठी पहिल्या गोलची नोंद करत सामना बरोबरीत आणला. या पाठोपाठ ७९ व्या मिनिटाला पवन माळीने गोल करीत संघाला ​२ - १​ अशी आघाडी मिळवून दिली. ​अधिकच्या वेळेत मोहमद खुर्शीद​ याने गोल नोंदवत दिलबहारचा विजय निश्‍चित केला. पवन माळी ​याला उत्कृष्ट खेळाडू म्हणून गौरवण्यात आले.

आजचा सामना
सायंकाळी चार - शिवाजी तरुण मंडळ विरुद्ध खंडोबा तालीम मंडळ

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y58023 Txt Kolhapur1

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top