
महेश काळे
महेश काळे
२१६८१
जादुई स्वराने रंगली
स्वरसंध्या मैफल
-----------
गायक महेश काळे यांच्या गायकीला कोल्हापूरकरांची दाद
कोल्हापूर, ता. १३ ः आलाप, हरकती, उत्तम ताणकीरया यांचा जादुई नजराणा मांडत सुप्रसिद्ध शास्त्रीय गायक महेश काळे यांनी स्वरसंध्या ही मैफल कोल्हापुरात रंगवली. टाळ्यांच्या गजरात रसिकांनी दाद देत मैफलीला प्रोत्साहित केले. नाट्य संगीतापासून भावगीतापर्यंत विविध गायन प्रकाराचा आनंद रसिकांनी द्विगुणित केला. शास्त्रीय संगीत, विशेषतः नाट्यसंगीत गायनात महेश काळे यांचे नाव आदराने घेतले जाते. नव्या पिढीचे प्रतिनिधित्व करणारा गायक म्हणून श्री. काळे यांना संगीत क्षेत्रात विशेष मान आहे. दोन वर्षात कोरोना संकटामुळे शास्त्रीय संगीताच्या मैतफली कोल्हापुरात फारशा झाल्या नाहीत रसिकांची हीच अडचण विचारात घेऊन श्री काळे कोल्हापूर दौऱ्यावर आले असता येथील शाहू सांस्कृतिक मंदिरात स्वरसंध्या संगीत मैफील रंगवली. पहिल्या टप्प्यात त्यांनी शास्त्रीय गायन केले त्यानंतर त्यांनी नाट्यपद पदाचे गायन सुरू केले. प्रत्येक द्रुपदाला आलाप, हरकती यांचा जादूई नजराना मांडत मैफलीत जान भरली. संगीत कट्यार काळजात घुसली, संगीत सौभद्र ,संगीत मानापमान नाटकातील पदे त्यांनी उत्तम ताकदीने सादर करीत उपस्थितांना थक्क केले. मैफलीच्या दुसऱ्या टप्प्यात त्यांनी रसिकांना सारेगमपदनिसा ही सरगम आपल्या साथीने गायला लावली तसेच सूर आणि स्वर यांचं नातं रसिकांशी जोडून दिले. रसिकांशी साधलेल्या या स्वरसंवादासोबतच त्यांनी ‘घेई छंद मकरंद'', हे नाट्यपद उत्तम ताकतीने सादर करीत उपस्थितांची दाद मिळवली. तशी ही संगीत मैफल उत्तरोत्तर रंगत गेली.
स्थानिक गजल गायक प्रल्हाद जाधव यांच्यासह स्थानिक वादकांनी त्यांना साथ संगत केली. अन्य साथ-संगत करणारे कलावंत यांची नावे अशी विनय खानोलकर तबला, केदार गुळवणी व्हायोलिन, विनोद मांडवकर पखवाज, अपूर्व द्रविड तालवाद्य, गीता कुलकर्णीसह गायन, चैतन्य पाठक, शर्वरी काशीद तानपुरा, अंकुश चौधरी तालवाद्य यांनी साथ संगत केली.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y58029 Txt Kolhapur
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..