धावत्या बसला आग | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

धावत्या बसला आग
धावत्या बसला आग

धावत्या बसला आग

sakal_logo
By

नाशिक-पुणे महामार्गावर
कोल्हापूर बसला आग

चालकाच्या प्रसंगावधानाने ३० प्रवासी बचावले

सकाळ वृत्तसेवा
सिन्नर, ता. १३ ः नाशिकहून प्रवाशांना घेऊन कोल्हापूरकडे जाणाऱ्या खासगी आराम बसला नाशिक-पुणे महामार्गावर सिन्नर जवळच्या मोहदरी घाटात आग लागल्याची घटना आज (ता. १३) रात्री सव्वानऊ वाजण्याच्या सुमारास घडली. चालकाच्या प्रसंगावधानामुळे बसमधील ३० प्रवासी बचावले असून, या दुर्घटनेत प्रवाशांच्या सामानासह बस जळून खाक झाली.
नाशिकहून कोल्हापूरकडे प्रवाशांना घेऊन लॅबेक ट्रॅव्हल्स कंपनीची वातानुकूलित आराम बसच्या (एमएच ०९, सीव्ही ३०६९) एसीमध्ये बिघाड होऊन ही घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज आहे. स्लीपर कोच असलेल्या या बसमध्ये ३० प्रवासी होते. सिन्नर जवळच्या मोहदरी घाटात आल्यावर बसच्या एसीमध्ये बिघाड झाल्याचे चालकाच्या निदर्शनास आले. त्याने प्रसंगावधान राखत बस घाटातच रस्त्याच्या कडेला नेली. यानंतर प्रवाशांना एक-एक करत गाडीपासून दूर जाण्याचे आवाहन त्यांनी केले. याच दरम्यान आगीचा भडका होऊन संपूर्ण बस पेटली. प्रवासी बसमधून सुखरूप बाहेर पडले असले तरी सामान मात्र डिकीत व बर्थ मध्येच राहिले होते. हे सर्व सामान आगीत स्वाहा झाले.
घाटात बसला आग लागल्याची माहिती मिळाल्यानंतर सिन्नर नगरपालिका व एआयडीसीच्या अग्निशमन बंबांनी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र, तोपर्यंत केवळ बसचा सांगाडा उरला होता. सिन्नर व एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी येत दोन्ही बाजूंनी तासभर खोळंबलेली वाहतूक सुरळीत केली.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y58031 Txt Kolhapur1

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top