आवश्यक संक्षिप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आवश्यक संक्षिप्त
आवश्यक संक्षिप्त

आवश्यक संक्षिप्त

sakal_logo
By

21694
‘आव्हाने पेलताना’ पुस्तकाचे प्रकाशन
कोल्हापूर ः संकट कोसळले तरी जीवनात हार न मानता स्वकर्तृत्वाचे विश्व फुलवणाऱ्या महिलांची यशोगाथा पत्रकार अश्विनी टेंबे यांच्या ‘आव्हाने पेलताना’ या पुस्तकातून उलगडली आहे. त्या सर्वांसाठीच आदर्शवत असल्याचे गौरवोद्गार स्वयंसिद्धा संस्थेच्या संचालिका कांचन परुळेकर यांनी काढले. शाहू स्मारक भवनात झालेल्या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात त्या बोलत होत्या. ज्येष्ठ पत्रकार उदय कुलकर्णी हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
सध्याच्या जगात महिलांनी कला कौशल्य ज्ञान व शिष्टाचार आत्मसात करून ‘मी माझा सांगाती’ हे कृतीतून दाखविण्याची वेळ असल्याचेही परुळेकर यांनी सांगितले. उदय कुलकर्णी यांनी पुस्तकाची वैशिष्ट्ये अधोरेखित केली. सरळ सोपी भाषा, प्रवाही लेखन आणि संघर्षशील महिलांच्या यशस्वी जीवनाचा उलगडणारा प्रवास यामुळे आव्हाने पेलताना हे पुस्तक निश्चितच वाचक मनाचा ठाव घेईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सुखदा कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले. संध्या टेंबे यांनी स्वागत केले. सुधीर दप्तरदार यांची प्रमुख उपस्थिती होती.
-
21690
पाटोळे परिवारातर्फे घरकुलासाठी मदत
कोल्हापूर ः येथील हॉटेल परखचे संदीप पाटोळे आणि पाटोळे परिवारातर्फे सुषमा बटकडली यांच्या घरकुलासाठी पन्नास हजार रुपयांचा निधी देण्यात आला. यावेळी सत्यजित कदम, अजित पाटोळे, राजाराम पाटोळे, राजसिंह शेळके, राजेंद्र डकरे आदी उपस्थित होते. बटकडली समाजातील निराधार महिलांसाठी काम करतात. अशा महिलांसाठी घरकुल उभारणी सुरू असून, त्यासाठी प्रतिज्ञा नाट्यरंग संस्थेने समाजातील दातृत्वाला साद घातली आहे. त्याला प्रतिसाद देत वाढदिवसाचा खर्च टाळून पाटोळे कुटुंबीयांनी हा निधी दिला.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y58052 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top