पोलिस वृत्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पोलिस वृत्त
पोलिस वृत्त

पोलिस वृत्त

sakal_logo
By

तरुणास मारहाण
कोल्हापूर ः पूर्ववैमनस्यातून तरुणास गजाने मारहाण केल्याप्रकरणी लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. प्रथमेश जानकर, राम बोडके, रामचंद्र आडुळकर अशी त्या संशयितांची नावे आहेत. हा प्रकार काल सायंकाळी फुलेवाडी नाका परिसरात घडला. याबाबतची फिर्याद जखमी चंद्रकांत गोविंद खोदंल (वय २०, रा. गणेश कॉलनी) यांनी दिल्याचे पोलिसांनी सांगितले.

अपघातात एक जखमी
कोल्हापूर ः चिखली फाटा येथे पहाटेच्या सुमारास झालेल्या रस्ते अपघातात एक जण जखमी झाला. राजेश अरविंद वाडकर (वय ५२, पत्ता माहीत नाही) असे जखमीचे नाव आहे. त्यांना रुग्णवाहिकेतून ‘सीपीआर’मध्ये दाखल करण्यात आले. याची नोंद ‘सीपीआर’ चौकीत झाली.

अपघातात तरुण जखमी
कोल्हापूर ः सांगली फाटा येथे मध्यरात्री झालेल्या अपघातात तरुण जखमी झाला. उमेश शंकर तावडे (वय ३६, रा. चिंचेवाडी, ता. गडहिंग्लज) असे जखमींचे नाव आहे. त्यांना ‘सीपीआर’मध्ये दाखल केले. याची नोंद ‘सीपीआर’ चौकीत झाली.

मारहाणीत दोघे जखमी
कोल्हापूर ः गोकुळ शिरगाव येथे काल रात्री झालेल्या मारहाणीत दोघे तरुण जखमी झाले. विजय एकशिंगे, गौरव पारगावकर अशी जखमींची नावे आहेत. त्यांना ‘सीपीआर’मध्ये दाखल केले. याची नोंद ‘सीपीआर’ चौकीत झाली.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y58106 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top