रंग- शिल्पसौंदर्य | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रंग- शिल्पसौंदर्य
रंग- शिल्पसौंदर्य

रंग- शिल्पसौंदर्य

sakal_logo
By

शिल्पसौंदर्य- अजय दळवी
-
फोटो
-

रणरागिणी ताराराणी
कोल्हापुरातील पहिले शिल्प

रणरागिणी ताराराणींचे ताराराणी विद्यापीठाच्या आवारात १९७२ मध्ये उभारलेला पहिला पुतळा आहे. उजवा पाय पुढे टाकत निघालेल्या तगड्या अश्र्वावर आरूढ असणाऱ्या महाराणी ताराराणी, असे हे भव्य शिल्प आहे. उजव्या हातात तलवार, डाव्या हाताने धरलेला घोड्याचा लगाम, पाठीवर ढाल, मनगटावर दस्तानी, चेहऱ्यावरील करारी मुद्रा, मोगल साम्राज्याला झुंजवणारी मराठ्यांची महाराणी आणि तिची झंझावाती कारकीर्द या पुतळ्यावरून डोळ्यासमोर उभी राहाते. ताराराणींची साहेबांची रुबाबदार पोज आणि दीर्घ काळ मजल मारणारी घोड्याची ऐटबाज चाल हे या शिल्पातले मुख्य आकर्षण आहे. पिळदार स्नायू आणि तडतडलेल्या शिरा आणि घोड्याचा मजबूत शरीरबांधा शिल्पकाराने सुंदर घडवला आहे. ताराराणींनी तलवार धरलेला हात आणि त्यातून शिल्पाला मिळणारी गती, शिल्प पाहणाऱ्याला हमखास खिळवून ठेवते. जगप्रसिद्ध सेनानी आणि बांगलादेशचे युद्ध जिंकून देणाऱ्या जनरल एस. एच. एफ. जे. माणेकशा यांच्या हस्ते २२ फेब्रुवारी १९७२ ला या शिल्पाचे अनावरण मान्यवरांच्या उपस्थितीत झाले. ताराराणी विद्यापीठाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. व्ही. टी. पाटील यांनी त्यासाठी पुढाकार घेतला होता.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y58156 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top