सर्व शिक्षाचे कर्मचारी आंदोलनाच्या पवित्र्यात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सर्व शिक्षाचे कर्मचारी आंदोलनाच्या पवित्र्यात
सर्व शिक्षाचे कर्मचारी आंदोलनाच्या पवित्र्यात

सर्व शिक्षाचे कर्मचारी आंदोलनाच्या पवित्र्यात

sakal_logo
By

सर्व शिक्षाचे कर्मचारी
आंदोलनाच्या पवित्र्यात
चार वर्षांपासून मानधन वाढ नाही
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १४ : जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाकडून समग्र शिक्षा अर्थात सर्व शिक्षा अभियान राबवण्यात येत आहे. १७ वर्षांपासून हे अभियान सुरू आहे. केंद्र शासनाच्या प्रकल्पात जिल्हा स्तरावर १९८ पैकी १२० कर्मचारी काम करतात. सर्व शिक्षात जिल्‍ह्याचे काम उठावदार आहे. असे असले तरी या अभियानात काम करणाऱ्या‍ कर्मचाऱ्यांची कुचंबना सुरू आहे. त्यांच्या मानधनात चार वर्षांपासून वाढच नाही. सर्व शिक्षबरोबर सुरु असलेल्या राष्‍ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान असो की संपूर्ण स्‍वच्‍छता अभियान, येथील कर्मचाऱ्यां‍ना नियमित मानधनवाढ केली जाते. मात्र सर्व शिक्षाबाबत दुजाभव अस केल्याचे दिसते. दरवर्षी मागणी करूनही त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने कर्मचारी आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत.
राज्य आणि केंद्र शासनाच्या कर्मचाऱ्यांना दरवर्षी तीन टक्के पगारवाढ दिली जाते. आरोग्य विभागाच्या कंत्राटी कर्मचार्‍यांना तर वर्षाला आठ टक्‍के मानधनवाढ केली जाते. देशात वाढणारी महागाई याचा विचार करून ही वेतनवाढ, मानधनवाढ दिली जाते. मात्र शिक्षण विभागातील एकाच कार्यालयात अतिरिक्त कामाचा ताण सहन करत कंत्राटी कर्मचारी अनेक वर्षे काम करत आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y58173 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top