
केंद्र पुरस्कृत योजनातील कर्मचाऱ्यांना वेतनाची प्रतीक्षा
केंद्र योजनातील
कर्मचाऱ्यांना वेतनाची प्रतीक्षा
कोल्हापूर : केंद्र, राज्य सरकार पुरस्कृत योजनात काम करत असणाऱ्या कर्मचारी, अधिकारी यांचे वेतन तीन महिन्यापासून रखडले आहे. अनेक कर्मचारी अडचणीत सापडले आहेत. यात महिला बाल विकास, आरोग्य तसेच अन्य विभगांचा समावेश आहे. मार्च २०२२ पासून लेखा विषयक ‘एसएनए’ प्रणाली उघडली आहे.
त्या माध्यमातून केंद्र, राज्य योजनेतील कर्मचाऱ्यांचे पगार दिले जातात. राज्यातील अनेक विभागातील अधिकारी आणि कर्मचारी यांचे वेतन केंद्र व राज्य हिस्सा
या दोन्हीतून देण्यात येते. सर्व विभागातील अधिकारी/ कर्मचारी यांचे वेतन मार्चपासून रखडले आहे. वेतन थांबले असल्याने अनेक कर्मचाऱ्यांचे घराचे, वाहनाचे हप्ते थांबले आहेत. विम्याचे हप्ते थांबले आहेत. वैद्यकीय खर्च करणेही अवघड झाले आहे. चेक बाऊन्ससारखे प्रकार घडत असून कर्मचाऱ्यांना अतिरिक्त दंड भरावा लागत आहे. त्यामुळे आर्थिक प्रश्न निर्माण झाला आहे. वेतनाच्या व इतर आर्थिक बाबींसाठी अधिकारी व कर्मचारी वित्त विभागाकडे पाठपुरावा करत आहेत. मात्र अद्यापतरी यात यश आलेले नाही.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y58175 Txt Kolhapur
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..