अंबाबाई मंदिरात ‘प्रसाद’ योजना घ्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अंबाबाई मंदिरात ‘प्रसाद’ योजना घ्या
अंबाबाई मंदिरात ‘प्रसाद’ योजना घ्या

अंबाबाई मंदिरात ‘प्रसाद’ योजना घ्या

sakal_logo
By

केंद्र शासनाच्या प्रसाद योजनेत
अंबाबाई मंदिराचा समावेश करा

राजेश क्षीरसागर यांची मागणी; मंत्री आदित्य ठाकरेंना ई-मेल

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १४ ः करवीर निवासिनी अंबाबाई मंदिराचा समावेश केंद्र शासनाच्या प्रसाद योजनेत होण्याकरिता राज्य शासनाने सकारात्मक पावले उचलावीत, अशी मागणी राज्य नियोजन मंडळाचे कार्याध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी केली. या मागणीचा इ-मेल त्यांनी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांना पाठविला आहे.
करवीर निवासिनी अंबाबाई हे देशातील ५१ शक्तिपीठांपैकी एक प्रमुख पीठ आहे. मंदिराची स्थापना सुमारे ८०० वर्षांपेक्षा अधिकची आहे. वास्तुरचना हेमाडपंथी आहे. मंदिरात नवरात्रोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होतो. या कालावधीत सुमारे २५ लाखांपेक्षा अधिक भाविक देशभरातून दर्शनाकरिता येतात.
केंद्र शासनामार्फत अशा मोठ्या मंदिरांकरिता व त्यांना भेट देणाऱ्या भाविकांकरिता ‘प्रसाद’ ही योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत मंदिराचा समावेश होण्याबाबतचा प्रस्ताव कोल्हापूर महापालिका प्रशासनाकडून राज्य पर्यटन विभागास सादर केला आहे. राज्य पर्यटन विभागाची शिफारस आणि नाहरकत दाखला आवश्यक असून, १५ मे रोजी केंद्रीय पर्यटन मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय पर्यटन संचालनालय (भारत सरकार, मुंबई) येथील कार्यालयात महाराष्ट्र पर्यटन विकासासंदर्भात बैठक होणार आहे. या बैठकीपूर्वी कोट्यवधी भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात भाविकांना सुविधा पुरविण्याच्या दृष्टीने विकासात्मक पावले उचलणे महत्त्वाचे आहे. यासाठी मंदिराचा समावेश केंद्र शासनाच्या ‘प्रसाद’ योजनेंतर्गत होण्यासाठी राज्य शासनाकडून शिफारस करण्यात यावी, असे निवेदनात म्हटले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y58190 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top