रंकाळा खणीचे रुपडे पालटणार, | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रंकाळा खणीचे रुपडे पालटणार,
रंकाळा खणीचे रुपडे पालटणार,

रंकाळा खणीचे रुपडे पालटणार,

sakal_logo
By

21834
कोल्हापूर ःरंकाळा खणीचे लेव्हल सर्वेचे कामाचे काम करताना अजय कोराणे, अमरदीप मंडलिक, प्रदीप कुलकर्णी, प्रा. शितल वरुर व केआयटी कॉलेजचे विद्यार्थी

रंकाळा खणीचे लेव्हल सर्व्हे काम सुरू
कोल्हापूर, ता. १४ ः रंकाळा खणीचे रुपडे पाटलण्यासाठी नुकतेच पालकमंत्री सतेज पाटील यांनी ३० लाख रुपयांचा निधी देण्याचे आश्‍वासन दिले आहे. खणीचे संवर्धन, स्वच्छता व पर्यावरणपूरक विकासासाठीची जबाबदारी असोसिएशन ऑफ आर्किटेक्टस अँड इंजिनिअर्सने घेतली आहे. त्याची सुरवात खणीचे लेव्हल सर्व्हे कामातून करण्यात आली. विशेष म्हणजे पद्मश्री प्रा. जी. डी. यादव यांच्याशी संपर्क साधून या खनिवर पाणी शुद्धीकरणासाठी बसविलेल्या यंत्रासाठी वीज बिलांचा प्रश्‍नही निकाली काढण्याबाबत चर्चा झाली.
काही दिवसांपूर्वी पालकमंत्री पाटील यांनी या खाणीवर सकाळी भेट दिली. यावेळी रंकाळा खण विहार सेवाभाव मित्र मंडळाने स्वच्छता व पर्यावरणपूरक विकासाठी प्रयत्न करण्याची विनंती केली. त्यावेळी तातडीने तीस लाख रुपयांच्या निधीची घोषणा केली. तसेच आर्किटेक्टस असोसिएशनकडे संवर्धनाची जबाबदारी दिली. त्यानुसार त्यांनी आज काम सुरू केले असून, के. आय. टी. कॉलेजचे सिव्हिल विभाग प्रमुख प्रा. मोहन चव्हाण व प्रा. शितल वरुर यांचेही सहकार्य लागले. तसेच डि.जी. पी.एस. व टोटल स्टेशन उपकरणांचा वापर करत लेव्हल सर्वेक्षणाचे काम पूर्ण केले. यासाठी प्रदीप कुलकर्णी यांचे सहकार्य लाभले. निक माजी नगरसेवक शारंगधर देशमुख व नागरिक उपस्थित होते. येथे नॅचरल स्टोनसह अन्य सुशोभिकरण होणार आहे.
प्रा.जी. डी. यादव यांच्याशी पालकमंत्री पाटील यांचीही भेट झाली. यावेळी या खणीवरपाणी शुद्धीकरणासाठी ''हायड्रोडायनॅमिक कॅविटेशन '' टेक्नॉलॉजी वापरून बसविलेल्या यंत्रणेची माहिती घेतली. ही यंत्रणा सुस्थितीत असून वीज बिलाची व्यवस्था केल्यास गरजेनुसार वापरता येईल असे सांगितल्याची माहिती अध्यक्ष कोराणे यांनी दिली.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y58194 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top