संभाजीराजे जयंती एकत्रितपणे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

संभाजीराजे जयंती एकत्रितपणे
संभाजीराजे जयंती एकत्रितपणे

संभाजीराजे जयंती एकत्रितपणे

sakal_logo
By

21847

छत्रपती शंभूराजेंना मानाचा मुजरा
जयंतीनिमित्त भव्य मिरवणूकांसह प्रबोधनपर उपक्रमांवर भर

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १४ ः ‘छत्रपती संभाजी महाराज की जय..’ अशा जयघोषात आज शहरातील विविध ठिकाणी भव्य मिरवणुका निघाल्या. छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त झालेल्या या मिरवणुकांत हालगी-घुमक्यासह ढोलपथके आणि पारंपरिक वेशभूषेचा थाट अनुभवायला मिळाला. दरम्यान, दिवसभर विविध संस्था, संघटनांतर्फे अभिवादनाबरोबरच विविध प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन झाले. शाहिरी पोवाड्यांनी दिवसभर शहर दुमदुमून गेले.
संयुक्त संभाजीनगर उत्सव समितीतर्फे सायंकाळी बिंदू चौकासह संभाजीनगर, रामानंदनगर, जरगनगर, रायगड कॉलनी, कसबा बावडा येथून मिरवणुका निघाल्या. मराठा सेवा संघ- संभाजी ब्रिगेडच्या वतीने सकाळी रूईकर कॉलनी येथील स्मारकस्थळी अभिवादन झाले. शिवशक्ती प्रतिष्ठान, शंभूराजे मर्दानी खेळ विकास मंचच्या वतीने स्वच्छता मोहिमेबरोबरच दिपोत्सवाचे आयोजन झाले.
...
फक्त फोटो : 21813
कोल्हापूर : संयुक्त मंगळवार पेठ, राजर्षी शाहू तरुण मंडळातर्फे उभारलेला छत्रपती संभाजी राजेंचा भव्य फलक.
...
फक्त फोटो : 21815
कोल्हापूर : शेतकरी कामगार पक्षातर्फे टेंबे रोड येथील कार्यालयात छत्रपती संभाजीराजे यांच्या प्रतिमेला शाहीर रंगराव पाटील यांनी पुष्पहार घालून अभिवादन केले. शहर चिटणीस बाबुराव कदम, प्राचार्य टी. एस. पाटील, अतुल दिघे, दिलीपकुमार जाधव, संभाजीराव जगदाळे, संग्राम माने, प्रकाश शिंदे, प्रदीप चौगुले, मयुर देसाई, पराग निटूरकर आदी उपस्थित होते.
...
21806
पापाची तिकटी ः येथील राजे संभाजी स्मारक समितीतर्फे स्मारकाच्या ठिकाणी महिलांनी जन्मकाळ साजरा केला.
राजे संभाजी स्मारक समिती
कोल्हापूर ः पापाची तिकटी येथील राजे संभाजी स्मारक समितीतर्फे स्मारकाच्या ठिकाणी महिलांनी जन्मकाळ साजरा केला. वाहतूक निरीक्षक स्नेहा गिरी यांच्या हस्ते पाळणापूजन झाले. शीला माजगावकर, मेघा पुरेकर, प्रतिभा माजगावकर, पद्मजा माजगावकर, शर्मिला वाघवेकर, मनिषा ब्रम्हपुरे, सुमन वाघवेकर, पार्वती वाघवेकर, उषा पाटील आदिंनी पाळण्याची गाणी गायिली. ओंकार शिंदे, सौरभ निकम, नितीन ब्रम्हपुरे, चेतन साळोखे, आकाश गुरवळ, अक्षय ओतारी, स्वप्नील सावंत, रोहीत पंडत, सुभम माळवी, मयुरेश भोसले, विशाल पाटील, सोम देशपांडे आदी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. लाठीकाठी, लेझीमसह मुख्य रस्त्यावरून शोभा यात्रा काढली. महापालिका अतिक्रमण विभागाचे अधिकारी पंडीत पवार यांनी नियोजन केले.
...
मिरवणुकीने संभाजी राजेंना अभिवादन
शिवाजी पेठेतील आनंदराव पोवार प्राचीन युद्ध कला प्रशिक्षण संस्थेतर्फे मिरवणूक काढली. लेझीम, लाठीकाठी, दांडपट्टा, फरीगदगाची प्रात्यक्षिके दीडशेहून अधिक शिबिरार्थीनी सादर केले. पापाची तिकटी येथील छत्रपती संभाजी महाराज स्मारकापासून मुख्य मार्गांवरून मिरवणूक झाली. पापाची तिकटी येथे संभाजी महाराज मार्गाचे पूजन मोहब्बत सिंग देवल, ईश्वर परमार, फिरोज भाई सतारमेकर, खंडोबा तालमीचे अध्यक्ष सुरेश पोवार, उपाध्यक्ष स्वप्निल पाटोळे, वस्ताद पंडित पोवार, अमोल कुरणे यांच्या हस्ते झाले. यानंतर ही मिरवणूक पापाची तिकटी, कसबा गेट, जोतिबा रोड, महाद्वार चौक, बिनखांबी गणेश मंदिर, निवृत्ती चौकमार्गे पद्माराजे गार्डन येथे आली. उमेश कोडोलीकर, संजय पाटील, संजय चव्हाण, सुप्रिया शिंदे, कल्याणी चाबूक, रवी दुर्गे, अतुल महेकर, पियुष पांडव, प्रतीक पाटील, दिडशेहून अधिक शिबिरार्थी, पालक सहभागी झाले.
...
01305
फराकटेवाडी : येथील मर्द मराठा मंडळाच्यावतीने छत्रपती संभाजीराजेंच्या जयंतीनिमित्त काढण्यात आलेली मिरवणूक

ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक
बिद्री: फराकटेवाडी (ता.कागल) येथील मर्द मराठा मंडळाच्यावतीने विविध कार्यक्रम झाले. संभाजी चौकात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती.बिद्री कारखाना ते फराकटेवाडीपर्यंत छत्रपती संभाजीराजेंच्या पुतळ्याची ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली. यावेळी संभाजीराजे यांच्या घोषणांनी फराकटेवाडी परिसर दणाणून गेला होता. संभाजीराजे यांच्या प्रतिमेचे पूजन सागर हरी फराकटे, रोहित बाळासाहेब फराकटे यांच्या हस्ते झाले. कृष्णात फराकटे, संदीप फराकटे , शुभम फराकटे, अक्षय फराकटे, सुशांत फराकटे, रोहित फराकटे, ज्ञानेश्वर फराकटे उपस्थित होते.
-
दानोळी परिसर
दानोळी ः येथे सरपंच सुनिता वाळकुंजे यांच्या हस्ते छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन झाले. जनसेवा सेवा सोसायटीचे चेरमन पैलवान केशव राऊत, सर्जेराव शिंदे, राम शिंदे, रामचंद्र वाळकुंजे, महादेवराव धनवडे, गुंडू दळवी, उदय राऊत, दिनकर कांबळे, अतुल माने, वैभव कणसे, संदीप हवालदार, पीटू पाराज, उपस्थित होते
-

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y58199 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top