हसन मुश्रीफ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

हसन मुश्रीफ
हसन मुश्रीफ

हसन मुश्रीफ

sakal_logo
By

फोटो- मुश्रीफ, सतेज


‘गोकुळ’मध्ये हस्तक्षेप नाही; पण लक्ष देऊ
----------------------
सतेज पाटील; पाच जिल्ह्यांचा गोकुळ एकच ब्रॅंड करणार : हसन मुश्रीफ
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १४ : दुधाची वाढती मागणी पाहता, ते दूध कमी प्रतीचे आहे असे म्हणणे चुकीचे आहे. ‘गोकुळ’मध्ये सत्ता मिळवण्यासाठी उत्पादकांना आम्ही अभिवचन दिले आहे. त्यामुळे आम्हाला लक्ष द्यावे लागले, आमचा हस्तक्षेप नाही, अशी माहिती पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिली तर
कोल्हापूर, पुणे, सोलापूर, सांगली, सातारा या पाच जिल्हा दूध संघांकडून संकलित होणाऱ्या दुधाचा ‘गोकुळ’ एकच ब्रॅंड करण्यासाठी प्रयत्न केला जाईल, ‘गोकुळ’मध्ये सतेज पाटील यांचा हस्तक्षेप होतो; पण मुश्रीफ यांचा होत नाही, म्हणून दोघांत भांडण लावण्याचा प्रयत्न करू नका, असे आवाहन ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी ‘गोकुळ’च्या संचालिका शौमिका महाडिक यांना केले. श्री. पाटील, श्री. मुश्रीफ पत्रकार परिषदेत बोलत होते.
मंत्री पाटील म्हणाले, ‘गोकुळ’मध्ये सत्ता परिवर्तन करताना आम्ही नेतृत्व केले आहे; पण आम्ही लक्ष द्यायचे नाही का? निवडणुकीत लोकांना आणि उत्पादकांना चार पैसे जास्त मिळवून देण्यासाठी अभिवचन दिले. आम्हाला मोठ्या विश्‍वासाने सत्ता दिली. आम्ही त्यांच्याशी बांधिल आहोत, उद्या काहीही घडले तर त्याला जबाबदार आम्हीच आहे. ‘गोकुळ’मध्ये आमचा हस्तक्षेप नाही; पण आम्हाला लक्ष दिलेच पाहिजे, त्यामुळे दोन्ही बाजूंनी हलगी वाजवू नका? अशी विनंतीही त्यानी केली.
मंत्री मुश्रीफ म्हणाले, दूध उत्पादन वाढविण्यासाठी जिल्हा बॅंकेतर्फे ५०० कोटींहून अधिक कर्ज दिले. म्हशीच्या दुधात वाढ झालीच पाहिजे. तीन ते चार महिन्यांत उष्णता वाढली, त्यामुळे दूध संकलनही घटले आहे. दूध संकलनासाठी संघाला प्रयत्न करावे लागणार आहेत. राजकारणात आरोप प्रत्यारोप होत राहतील. मात्र, संघावर परिणाम होईल, अशा गोष्टी संचालकांनी टाळल्या पाहिजेत.

त्यांच्या बोलण्यात तथ्य नाही
दुधाची प्रत कमी असेल तर दुधाची खरेदी-विक्री वाढली कशी. प्रत कमी असेल तर त्याचा खप कमी झाला पाहिजे होता. याउलट दूध विक्री वाढली आहे. त्यामुळे दुधाची प्रत चांगली नाही, म्हणणाऱ्या संचालिकांच्या बोलण्यात तथ्य नाही, असे उत्तर पालकमंत्री पाटील यांनी शौमिका महाडिक यांना दिले.

* आमच्यात भांडणे लावण्याचा प्रयत्न
विधानसभेची निवडणूक सुरू असताना ‘गोकुळ''वर टीका केल्या जात होत्या. गोकुळ २५ ते ३० वर्ष शौमिका महाडिक यांच्या सासऱ्यांच्या ताब्यात होता.
आज आमच्या ताब्यात आला. आपण त्या ब्रॅंण्डला जपले पाहिजे, असे आवाहन करत सतेज पाटील यांचा ‘गोकुळ’मध्ये हस्तक्षेप आहे आणि मुश्रीफ यांचा नाही म्हणणे, म्हणजे आमच्या दोघांत भांडण लावण्यातला प्रकार असल्याची टीकाही मुश्रीफ यांनी केली. वार्षिक सभेला महादेवराव महाडिक येऊन बसतात अस म्हणालो नसल्याचे मुश्रीफ यांनी सांगितले.

* ग्राहकांकडून इतर संघांप्रमाणेच दर
अमूल ज्या दरात दूध विक्री करत आहे, त्याच दरात ‘गोकुळ’चीही दूध विक्री सुरू आहे. इतर संघापेक्षा आम्ही जादा दराने ग्राहकांना दूध विक्री करत नाही. इतरांपेक्षा जादा दर आकारात असेल तर निश्‍चित विचार केला असता. ही उत्पादकांची संस्था आहे. दूध विक्री दरातून गेल्यावर्षी ७१ कोटी रुपये मिळाले होते. यापैकी ८५ टक्के रक्कम उत्पादकांना दिली होती. ग्राहकांना मोफत दूध द्यावे, अशी तुमची अपेक्षा आहे का? असाही सवाल मुश्रीफ यांनी उपस्थित केला.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y58211 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top