
पत्रकांच्या काही बातम्या एकत्रितपणे
रायफल शूटिंग प्रशिक्षण शिबिर
कोल्हापूर : जिल्हा मेन अँड वूमन रायफल असोसिएशन आणि कोल्हापूर महापालिकेतर्फे ता. २१ ते २६ या कालावधीत छत्रपती संभाजीराजे नेमबाजी प्रशिक्षण केंद्र, दुधाळी येथे एअर रायफल प्रशिक्षण शिबिर आयोजित केले आहे. शिबिरात आंतरराष्ट्रीय नेमबाज, ज्येष्ठ प्रशिक्षक रमेश कुसाळे, आय.एस.एस.एफ. प्रशिक्षक तेजस कुसाळे, पिस्तूल प्रशिक्षक स्नेहा कुसाळे, राष्ट्रीय नेमबाज शिवतेज खराडे यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. शिबिरात भाग घेऊ इच्छिणाऱ्यांनी दुधाळी येथील छत्रपती संभाजीराजे नेमबाजी प्रशिक्षण केंद्र येथे नाव नोंदणी करावी, असे जिल्हा मेन अँड वूमन रायफल असोसिएशनचे अध्यक्ष अजित खराडे यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे.
21832
सन्मित्र विद्यालयाचे यश
कोल्हापूर : समृद्धी प्रज्ञाशोध परीक्षेत सन्मित्र विद्यालयाने यश मिळविले. यामध्ये पहिलीचे संचिता भवड, नारायणी नलवडे, शुभ्रा वरकले, हिरण्या गवळी, अर्णव देसाई, अर्जुन स्वामी, अन्वी साळोखे, अद्वैत पवार; तर दुसरीचे अर्णव पाटणे, स्वरा संदीप पवार (राज्यात तृतीय), देवराज जेरे, पार्थ चौगले, मैथिली पाटील, स्वराज इंगवले, अनिरुद्ध कुलकर्णी; तसेच तिसरीचे अथर्व कसबेकर, यशस्विनी माने, विघ्नेश जावडेकर; चौथीचे अर्णव भोसले, अर्णव पाटील, श्रेया कांबळे, राजवीर बकरे, तन्मय बोंद्रे यांचा समावेश आहे. मार्गदर्शक सौ. एन. जी. पुंगावकर, डी. जी. पाटील, सौ. एस. एस. पाटील, एस. बी. शिंदे, मुख्याध्याक शिवाजी भोसले यांनी मार्गदर्शन केले. संस्थेचे अध्यक्ष वसंतराव देशमुख, सचिव सुनील कुरणे, शारंगधर देशमुख यांचे प्रोत्साहन लाभले.
नाइट कॉलेजमध्ये मोडी लिपी अभ्यासक्रम
कोल्हापूर : मोडी लिपीचे प्रशिक्षण देण्यासाठी नाइट कॉलेजच्या मराठी विभागातर्फे १७ मेपासून एक महिन्याचा ‘मोडी लिपी प्रमाणपत्र कोर्स’ आयोजित केला आहे. आजीवन अध्ययन व विस्तार विभाग, शिवाजी विद्यापीठ मान्यताप्राप्त कोर्समध्ये मोडी लिपीचे वाचन व लेखनाचे संपूर्ण प्रशिक्षण विद्यार्थ्यांना दिले जाईल. नाइट कॉलेजमध्ये सायंकाळी ६ ते ८ वेळेत कोर्स होणार आहे. प्रवेशासाठी दहावी उत्तीर्ण असावे. इच्छुकांनी १५ मेपर्यंत मराठी विभागप्रमुख डॉ. अरुण शिंदे यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रभारी प्राचार्य डॉ. एस. जे. फराकटे यांनी केले आहे.
मुद्रितशोधन अभ्यासक्रम कोर्स
कोल्हापूर : नाइट कॉलेजच्या मराठी विभागातर्फे एक महिन्याचा ‘मुद्रितशोधन प्रमाणपत्र कोर्स’ आयोजित केला आहे. आजीवन अध्ययन व विस्तार विभाग शिवाजी विद्यापीठ मान्यताप्राप्त कोर्समध्ये मुद्रितशोधनाची संकल्पना, स्वरूप, मराठी लेखनविषयक नियम, व्याकरण, विरामचिन्हे, मुद्रितशोधनाची पद्धती, खुणा, प्रात्यक्षिक कार्य वगैरेंचे प्रशिक्षण तज्ज्ञ मार्गदर्शक देणार आहेत. नाइट कॉलेजमध्ये सायंकाळी ६ ते ८ वेळेत कोर्स होणार आहे. प्रवेशासाठी दहावी उत्तीर्ण असावे. इच्छुकांनी १५ मेपर्यंत मराठी विभागप्रमुख डॉ. अरुण शिंदे यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रभारी प्राचार्य डॉ. एस. जे. फराकटे यांनी केले आहे.
कमला कॉलेजमध्ये ग्रंथप्रदर्शन
कोल्हापूर : कमला कॉलेजच्या क्रांतिवीर रंगरावदादा पाटील ग्रंथालयातर्फे छत्रपती शाहू महाराजांवरील ग्रंथ प्रकाशन संपदेचे एकदिवसीय ग्रंथप्रदर्शन आयोजित केले. यात शाहू चरित्र साधने कृती समितीचे अध्यक्ष डॉ. रमेश जाधव, डॉ. जयसिंगराव पवार, डॉ. धनंजय कीर, नानासाहेब साळुंखे आदी मान्यवरांचे लिखित साहित्य खुले केले. इंग्रजी भाषेतून शाहू महाराजांवर दहा खंडांत लिहिलेले डॉ. विलास संगवे यांच्या ग्रंथांचे खंड मांडले होते. विविध व्याख्यानमाला, भाषणसंग्रह, शासकीय प्रकाशनांच्या पुस्तकांचा समावेश केला. ताराराणी विद्यापीठाचे कार्यकारी अध्यक्ष डॉ. क्रांतिकुमार पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. उद्घाटन प्राचार्या डॉ. तेजस्विनी मुडेकर यांच्या हस्ते झाले. ग्रंथपाल ऊर्मिला कदम यांनी ग्रंथप्रदर्शनाचा उद्देश स्पष्ट केला. डॉ. नीता धुमाळ, डॉ. अनिल घस्ते आदी उपस्थित होते.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y58212 Txt Kolhapur
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..