ओविसींनी महाराष्ट्राचा अपमान केला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ओविसींनी महाराष्ट्राचा अपमान केला
ओविसींनी महाराष्ट्राचा अपमान केला

ओविसींनी महाराष्ट्राचा अपमान केला

sakal_logo
By

ओविसींनी महाराष्ट्राचा
अपमान केला : हसन मुश्रीफ
कोल्हापूर, ता. १४ : ‘ज्यांचा महाराष्ट्राशी काहीही संबंध नाही, अशा असुद्दिन ओविसी यांना महाराष्ट्रात आणून जातीय तेढ निर्माण करण्याचे काम केले जात आहे. काही शक्ती यामागे कार्यकरत असून ओविसी यांनी औरंगजेबच्या कबरीला भेट देऊन महाराष्ट्राचा अपमान केला आहे, अशी टीका ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी आज केली. गोकुळसंघात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. श्री. मुश्रीफ म्हणाले, ‘‘छत्रपती शिवाजी महाराज यांनी सर्व जाती-धर्मातील मावळ्यांना एकत्र घेऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. शिवाजी महाराज यांचे शौर्य सर्वांना माहिती आहे. ओवीसी यांनी महाराष्ट्रात येण्याची आवश्‍यकता नव्हती. कोण त्या औरंगजेबाच्या कबरीवर जात नाही. तरीही, ते तिथे गेले आणि आमचा अपमान केला आहे. अनेक प्रयत्न होऊन ही महाराष्ट्रात काहीही अघटीत होत नाही. म्हणून त्यांना महाराष्ट्रात पाठवले आहे. जाती-जातींत दंगल घडवण्याचा प्रयत्नआहे. मुस्लिम समाजाने मोठा संयम पाळला आहे. यापुढेही ते संयम पाळतील. त्यामुळे ओविसी यांनी आमच्या राज्यात येऊन आमचा अपमान करण्याची गरज नव्हती. तेढ करण्याचे काम सुरू आहे. जर राज्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण झाल्यास ओविसी यांच्याबद्दल राज्य शासन विचार करेल.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y58226 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top