टीपी विभागावर फोकस करा - सतेज | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

टीपी विभागावर फोकस करा - सतेज
टीपी विभागावर फोकस करा - सतेज

टीपी विभागावर फोकस करा - सतेज

sakal_logo
By

21784

नगररचना विभागावर फोकस करा
पालकमंत्री सतेज पाटील; अग्नीशमन दलाच्या टर्नटेबल लॅडरचे लोकार्पण

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १४ ः नगररचना हा समाजसेवा करण्यासाठी नाही तर महापालिका उत्पन्न मिळवून देणारा विभाग आहे. या विभागात पारदर्शक आणि जलदगतीने काम झाले पाहिजे. यासाठी नगररचना विभागावर फोकस करा, अशी सक्त सूचना पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिल्या. अग्नीशमन दलाच्या टर्नटेबल लॅडरच्या लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते. शहरातील इमारतींना २३ मीटरची परवानगी दिली. त्यामुळे अग्निशमदलाकडे टर्नटेबल लॅडर असणे आवश्यक होते. कोल्हापूर ही राज्यातील तिसरी महापालिका आहे ज्यांच्याकडे टर्नटेबल लॅडर उपलब्ध झाले आहे. त्यामुळे २३ मीटर उंचीपर्यंत आग लागल्यास ती आटोक्यात आणता येईल. आज या लॅडरचे लोकार्पण झाले. सासने ग्राउंड येथील दिलीप देसाई क्रीडा संकुलमध्ये हा कार्यक्रम झाला. आमदार जयश्री जाधव, जयंत आसगावकर प्रमुख उपस्थित होते.
पालकमंत्री पाटील म्हणाले,‘प्रशासनाने चांगला गर्व्हनन्स राबवणे आवश्यक आहे. ऑनलाईन परवाने देण्याची पद्धत काही तांत्रिक कारणामुळे बंद झाली. ती आता पुन्हा सुरू करावीत.देश पातळीवरील स्वच्छतेच्या स्पर्धेत शहराचा क्रमांक घसरला आहे. तो पुन्हा वर कसा जाईल यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत.’
ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, ‘शहरातील विकासकामे गतीने झाली पाहिजेत. बांधकाम कामगार कल्याण मंडळाचा कामगार सेज टप्प्या टप्प्याने देता येईल का? याचा विचार करून गुंठेवारी सहा महिन्यात नियमित करण्याचा विचार असून, याची कार्यवाही लवकरच सुरू होईल. थेट पाईपलाईनचे काम गतीने सुरू असून, या दिवाळीला या पाण्याने अंघोळ होईल अशी शक्यता आहे. निवडणुकांची तयारी युद्धपातळीवर सुरू असून, महापालिकेची निवडणूक ऑक्टोबरमध्ये होईल. त्यासाठी कार्यकर्त्यांनी तयार रहावे’.
प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे म्हणाल्या, ‘दोन वर्षे कोविडमध्ये गेल्याने विकासकामे रखडली होती. मात्र, आता प्रशासनाने गतीने याबाबत उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. नगररचना विभागाने विशेष कँप घेऊन १ हजार ३७२ परवाने दिले. त्यातून काही कोटींची महसूल मिळाला. टर्नटेबल लॅडरमुळे आता उंच इमारतींच्या सुरक्षेचा प्रश्न कमी झाला आहे.’
क्रीडाईचे अध्यक्ष विद्यानंद बेडेकर म्हणाले, ‘डीपी रोडच्या विकासावर भर द्यावा. तसेच ५४ मिटरची परवानगी ७० मीटर पर्यंत द्यावी.’ माजी उपमहापौर संजय मोहिते, स्थायी समितीचे माजी सभापती शारंगधर देशमूख, आदिल फरास, अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, शहर अभियंता नेत्रदिप सरनोबत, अग्निशमन दलाचे मुख्य अधिकारी रणजीत चिले, दिलीप पोवार, मधुकर रामाणे, भुपाल शेटे, अर्जुन माने, अशफाक आजरेकर, प्रकाश गवंडी, रियाज सुभेदार यांच्यासह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
प्रास्ताविक नगररचना विभागाचे सहाय्यक संचालक रामचंद्र महाजन यांनी केले.

अग्नशिमनच्या जवानांना किमान वेतन द्या
पालकमंत्री पाटील म्हणाले, अग्निशमन दलाच्या जवानांनी महापुरात जीव धोक्यात घालून मोठे काम केले. त्यांना किमान वेतन मिळाले पाहिजे. प्रशासकांनी हा निर्णय घ्यावा आम्ही त्यांना लागेल ती मदत करू. टर्नटेबल लॅडरमुळे अग्निशमन दलाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.’

चौकट
पालकमंत्री म्हणाले,
- २०२१ मधील शंभर टक्के बाधित
महापूरग्रस्तांचा घरफाळा माफ करणार
- सहा महिन्यात गुंठेवारी नियमित करणार.
- हद्दवाढीसाठी क्रीडाईने ग्रामिण जनतेचा संभ्रम दूर करावा
- डीपी रोडची कामे सुरू करा.
-ऑक्टोबरमध्ये परीख पुलाला पर्यायी पूल उभारणार

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y58233 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top