
पान ३ मेन
21830
येणेचवंडी : आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेल्या तानाजी कुराडे यांच्या घराचे झालेले नुकसान.
-----------------------------
21831
सिंगल फोटो
आगीत जळालेली रोकड
येणेचवंडीत तीन घरे भस्मसात
आगीत तीन लाखांचे नुकसान : रोकडसह प्रापंचिक साहित्य जळाले
सकाळ वृत्तसेवा
नूल, ता. १४ : येणेचवंडी (ता. गडहिंग्लज) येथील तीन घरांना लागलेल्या आगीत तीन लाखांचे नुकसान झाले. यात ६० हजारांच्या रोकडसह प्रापंचिक साहित्याचा समावेश आहे. शुक्रवारी (ता.१३) रात्री घटना घडली. गजानन कुराडे यांच्या घराला प्रथम अचानक आग लागली. या घरात तानाजी कुराडे भाडेकरू म्हणून राहतात. त्यांच्या प्रापंचिक साहित्यासह धान्य, शेतीची अवजारे, माळ्यावरील साहित्य संपूर्ण आगीच्या भक्षस्थानी पडले. वाऱ्यामुळे पसरलेल्या आगीने शेजारील बाळासाहेब व आनंदा कुराडे यांच्याही घराला वेढले. या आगीत त्यांचेही प्रापंचिक साहित्य जळून खाक झाले.
याचवेळी शेजारील गल्लीत बारशाचा व दुसऱ्या ठिकाणी हळदीचा कार्यक्रम सुरू होता. तेथील तरूण घटनास्थळी धावले. सरपंच भारत झळके, उपसरपंच तानाजी कुराडे यांनी जनता दलाचे तालुकाध्यक्ष बाळेश नाईक, प्रकाश इंगळे यांच्या सहकार्याने गडहिंग्लज नगरपालिकेच्या अग्निशमन दलाला पाचारण केले. त्यांनी आग आटोक्यात आणली. आगीच्या भक्षस्थानी पडलेल्या घरातून नागरिकांनी प्रसंगावधान राखून सिलिंडरच्या टाक्या बाहेर काढल्या. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.
दरम्यान, आग लागली तेव्हा घरी कोणीच नव्हते. त्यामुळे आग कशी लागली हे समजू शकले नाही. परंतु, शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे. मंडल अधिकारी व्ही. ए. कामत, तलाठी शाजमीन शेख, कोतवाल शिवाजी कुराडे यांनी पंचनामा केला.
६० हजारांची रोकड जळाली...
आग लागलेल्या घरात भाडेकरू म्हणून राहिलेले तानाजी कुराडे घरकुलमधून घराचे बांधकाम करीत आहेत. त्यांनी बांधकामाच्या खर्चासाठी आणलेले ६० हजार रुपये पत्र्याच्या पेटीत ठेवलेले होते. तसेच बँकेसह इतर कागदपत्रे, दागिने पत्र्याच्या पेटीतच ठेवलेले होते. ते आगीच्या भक्षस्थानी पडल्याने कुराडे यांचे नुकसान झाले.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y58242 Txt Kolhapur
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..