
फसवणूक
साडेसोळा लाखांना
व्यापाऱ्याची फसवणूक
पाच जणांवर गुन्हा ; उधारी खरेदीतून प्रकार
कोल्हापूर, ता.१४ ः उधारीवर माल घेऊन व्यापाऱ्याची १६ लाख ६३ हजारांची फसवणूक केल्याप्रकरणी शाहूपुरी पोलिस ठाण्यात पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. रफिक रज्जाक बावानी, नजीर रज्जाक बावानी, अल्ताफ रज्जाक बावानी, रज्जाक सिद्धीक बावानी, रेहान रफिक बावानी (सर्व रा. रत्नागिरी) अशी संशयितांची नावे असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी सांगितले की, शाहूपुरी व्यापारी पेठ येथे एक ऑईलची फर्म आहे. संशयितांनी या फर्मसोबत गेली सात ते आठ वर्षे उधारीवर खाद्यमालाची खरेदी विक्रीचा व्यवहार करून विश्वास संपादन केला. त्यानी ऑक्टोबर २०१८ ते ३१ मार्च २०२२ या काळात उधारीवर मालाची खरेदी केली. त्यानी नुकसान भरपाईसह १६ लाख ६३ हजार ७१० रुपये परत न करता फसवणूक केल्याची फिर्याद शाहूपुरीतील व्यापाऱ्याने न्यायालयात केली. त्यानुसार संबंधितावर गुन्हा दाखल झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
------------
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y58246 Txt Kolhapur
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..