
शौमिका महाडिक
‘गोकुळ’ घशात घालण्याचे
नियोजन केले आहे का?
--
शौमिका महाडिक; दूध खरेदी दरवाढ करून काय कर्तृत्व गाजवले
कोल्हापूर, ता.१४ : दूध खरेदी दरवाढ ग्राहकांच्या माथी मारून पालकमंत्री सतेज पाटील यांनी काय कर्तृत्व गाजवले? दूध संघाबद्दल रितसर प्रश्न विचारल्यास बदनामी होत असेल तर पालकमंत्री १० वर्षांपासून पातळी सोडून निरर्थक टीका करत होते, ते संघाचा लौकिक वाढवायचे काम करत होते का, असा सवाल करत प्रश्नाला उत्तर न देता विषयांतर केले जाते, हिंमत असेल तर त्यांनी उत्तरे द्यावीत आणि स्वत:ची पाठ थोपटून घ्यावी, असे आवाहन गोकुळ संचालिका शौमिका महाडिक यांनी आज दिले. आजपर्यंत शेतकऱ्यांच्या मालकीचा असणारा गोकुळ दूध संघ ५ वर्षांत स्वत:च्या घशात घालण्याचे नियोजन केले आहे का, असाही सवाल महाडिक यांनी केला.
सौ. महाडिक यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, वर्षभरात सत्ताधाऱ्यांना अनागोंदी, हुकूमशाही कारभार पाहायला मिळाला. संघाची संचालिका असताना आपल्याला उत्तर दिली जात नाहीत. सत्ताधाऱ्यांनी व नेत्यांनी हिंमत असेल तर आपण विचारलेल्या प्रश्नांची लेखी उत्तरे द्यावीत. ‘गोकुळ’मध्ये माजी आमदार महादेवराव महाडिक यांची २५ वर्षे सत्ता होती. या दरम्यान, महाडिक यांनी हातकणंगले तालुक्यात किती मतदान वाढवले आणि त्या तुलनेत एका वर्षात आपण किती नव्या दूध संस्थांना मंजुरी दिली. कोणकोणत्या तालुक्यांत किती संस्था वाढल्या, याचा आकडा जाहीर करावा. नवीन दूध संस्थांमधून किती दूध संकलन वाढले, याचीही माहिती द्यावी. विधानसभा निवडणुकीत पालकमंत्री पाटील यांनी महादेवराव महाडिक यांच्यावर एकेरी शब्दात टीका केली. यावेळी, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी पालकमंत्र्यांना कसे बोलावे, हे सांगितले असते तर बर झाले असते.
सौ. महाडिक यांचे प्रश्न :
- ग्राहकांवर दूध दरवाढ का लादली
- विक्री दरातील वाढ किती, उत्पादकांना दिलेली रक्कम किती
- पुणे-मुंबईनंतर कोल्हापूरची दूध दरवाढ केली, यात गोकुळचा फायदा, तोटा किती
- वचनपूर्ती केली म्हणणाऱ्यांनी दूध दरवाढीचा भार ग्राहकांवर टाकला
- वाहतुकीसाठी टॅंकरचे नवीन दर काय आहेत?
-कोणाच्या मालकीचे किती टॅंकर?
-जुन्या दराने वाहतूक करणार का?
-ठेका बदलल्यानंतर एका दिवसात डिझेलचे दर वाढले का?
- वासाचे दूध कमी असेल तर ३ वर्षांची तुलनात्मक माहिती द्या
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y58252 Txt Kolhapur
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..