महिला प्रवाशांचे दागिने लंपास | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महिला प्रवाशांचे दागिने लंपास
महिला प्रवाशांचे दागिने लंपास

महिला प्रवाशांचे दागिने लंपास

sakal_logo
By

महिलेच्या पर्समधील
सहा तोळ्यांचे दागिने चोरीस

मध्यवर्ती बसस्थानकातील भरदिवसा प्रकार

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १४ ः एसटी बसमध्ये जाणाऱ्या महिलेच्या पर्समध्ये ठेवलेले सहा तोळ्यांचे दागिने चोरट्याने लांबवले. मध्यवर्ती बसस्थानकात आज सायंकाळच्या सुमारास हा प्रकार घडला. याची नोंद शाहूपुरी पोलिस ठाण्यात झाल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी सांगितले, ठाणे येथील सुप्रिया चव्हाण या नातेवाईकांच्या लग्नकार्यासाठी लिंगनूरला जाणार होत्या. त्यासाठी आज सायंकाळी साडेचारच्या सुमारास त्या मध्यवर्ती बसस्थानकात गेल्या. त्यांच्या खांद्याला पर्स होती. त्यात त्यांनी एका पिशवीत तीन तोळ्यांचे सोन्याचे गंठण, २१ ग्रॅम वजनाचा नेकलेस, एक तोळ्याचे ब्रेसलेट, एक सोन्याची नथ व इतर दोन साध्या नथ, असा एकूण १ लाख ९९ हजार किमतीचा ऐवज होता. चव्हाण बसस्थानकात आलेल्या गडहिंग्लज जाणाऱ्या बसमध्ये जात होत्या. त्यावेळी चोरट्याने पर्समधील दागिने चोरट्याने हातोहात लांबवले. अशी फिर्याद चव्हाण यांनी दिली. दरम्यान, परिसरातील सीसीटीव्ही आधारे पोलिसांनी तपास सुरू केला.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y58256 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top