
अंतिम प्रभाग रचना जाहीर
महापालिका लोगो
-
महापालिकेच्या सात प्रभागांत बदल
अंतिम प्रभाग रचना चार विभागीय कार्यालये, संकेतस्थळावर प्रसिद्ध
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १४ ः महापालिका निवडणुकीसाठी बनवलेल्या प्रभाग रचनेचे गॅझेट शुक्रवारी (ता.१३) रात्री प्रसिद्ध झाले. हरकतींवरील सुनावणीनंतर त्यानुसार ७ प्रभागांत तुरळक बदल केले आहेत. प्रभाग क्रमांक २, ३, १२, १३, १४, १८ आणि २० या प्रभागांत बदल केले आहेत. गॅझेट केलेली अंतिम प्रभागरचना चारही विभागीय कार्यालये, निवडणूक कार्यालयांबरोबरच महापालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली आहे.
महापालिकेच्या सभागृहाची मुदत १७ नोव्हेंबर २०२० ला संपली. त्यानंतर निवडणुकीसाठी प्रभाग रचना बनवली. मात्र, त्यानंतर कोरोनामुळे दोन वर्षे निवडणूक प्रक्रिया राबवता आली नाही. दरम्यान, बहुसदस्यीय प्रभाग रचना करण्याचा निर्णय झाल्याने महापालिकेने नव्याने प्रभाग रचना केली. नव्याने ३१ प्रभाग करण्यात आले. यावर सुमारे ११५ हरकती आल्या. त्यांची सुनावणी घेतल्यानंतर त्याचा अहवाल राज्य निवडणूक आयोगाला पाठवण्यात आला.
दरम्यान, ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण रद्द झाल्याने निवडणूक प्रक्रिया पुन्हा थांबली. त्यानंतर राज्य सरकारने निवडणुकांबाबतचे अधिकार आपल्याकडे ठेवण्याबाबतचा कायदा केला. मात्र, गेल्या आठवड्यात सर्वोच्च न्यायालयाने निवडणुकीची प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश दिले. त्यामुळे महापालिकेच्या प्रभाग रचनेवरील हरकतींप्रमाणे काही बदल करून बहुसदस्सीय प्रभाग रचनेला अंतिम स्वरूप देण्यात आले. आज ही प्रभाग रचना विभागीय कार्यालयांमधून प्रसिद्ध करण्यात आली. पुढील आदेशानंतर आरक्षणाची प्रक्रिया सुरू केली जाणार असल्याचे महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.
चौकट
बदल पुढीलप्रमाणे
- अष्टेकरनगर हे प्रभाग ३ मधून प्रभाग २ मध्ये घेतला
- कुंभार गल्ली, शाहूपुरी, जयंती नाला, रिलायन्स मॉल हा परिसर प्रभाग क्रमांक १२ मधून प्रभाग क्रमांक १३ मध्ये घेतला आहे.
- कैलासगडची स्वारी परिसर हा प्रभाग २० मधून प्रभाग १२ मध्ये घेतला आहे
- राजारामपुरी शाहू मिल कॉलनी हा परिसर प्रभाग १४ मधून प्रभाग क्रमांक १३ मध्ये घेतला
- मंडलिक वसाहत ईबी ७७ हा प्रभाग १८ मधून प्रभाग २० मध्ये घेतला आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y58263 Txt Kopcity Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..