सांगवडेत नरसिंह जयंती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सांगवडेत नरसिंह जयंती
सांगवडेत नरसिंह जयंती

सांगवडेत नरसिंह जयंती

sakal_logo
By

21848
सिंगल -21850

हजारो भाविकांच्या उपस्थित
सांगवडेत नरसिंह जयंती

सांगवडेवाडी, ता. १४ ः ‘नरसोबाच्या नावानं चांगभलं’च्या जयघोषात गुलाल, भेंड बत्तासे उधळत हजारो भाविकांच्या उपस्थित श्री नरसिंह जन्मकाळ सोहळा सांगवडे (ता. करवीर) येथे पार पडला. हजारो भाविकांनी दिवसभरात दर्शनासाठी गर्दी केली होती.
पहाटेपासून भाविकांनी दर्शनासाठी मंदिरात गर्दी केली होती. ‘श्री’च्या मूर्तीस पूजा अभिषेक करून श्री नरसिंह अवतारातील पूजा शिवप्रसाद गुरव, जयराज खांडेकर, रावसाहेब रावळ यांनी बांधली. दुपारी चार वाजता वाठारकर बुवा व सहकारी शाहीर धोंडिराम मगदूम, राजू सुतार महाराज, प्रकाश सुतार यांचे प्रवचन झाले. सायंकाळी ६ वा. ५२ मिनिटांनी जन्म सोहळा यशराज घोरपडे, आनंदनाथ महाराज सांगवडेकर व सरनोबत सरकार यांच्या उपस्थितीत झाला. सुंठवडा वाटप केला. आकर्षक पानाफुलांनी सजवलेल्या पालखीत ‘श्रीं’ची मूर्ती विराजमान होऊन ढोलांच्या गजरात पालखी सोहळा झाला. फटाक्यांच्या नेत्रदीपक आतषबाजीने आसमंत उजळून निघाले. रात्री हुपरी येथील सागर जोशी प्रस्तुत अमृतधारा गितमंचच्या भावगीते भक्तिगीते यांच्या सादरीकरणाने वेगळाच रंग भरला.
देवस्थान ट्रस्टतर्फे पांडुरंग बाळासो रावळ, दत्तात्रय रावळ, भालचंद्र गुरव, जयराज खांडेकर, दादू गुरव भाविकांच्या देणगीतून आकर्षक रंगीबेरंगी वेगवेगळ्या प्रकारची पाने व फुलांचा वापर करून संदीप सदाशिव रावळ फुलांचे व्यापारी निपाणी व सहकारी यांनी कलाकृतीने मंदिर सुशोभित केले होते. गौरव जोशी आनंदनाथ महाराज सांगवडेकर व राजू जोशी यांनी पणे व कोशिंबीर या प्रसादाचे वाटप केले.
पालखी सोहळ्यास पोलिसपाटील रोहिणी माने, सांगवडेच्या सरपंच रूपाली कुंभार, उपसरपंच सचिन माने व सदस्य, सांगवडेवाडी सरपंच वैशाली कल्कुटकी, उपसरपंच शीतल खोत, दादु गुरव, भालचंद्र गुरव, बबलू गुरव, नारायण गुरव, दत्तात्रय रावळ, सचिन रावळ, अविनाश रावळ, रवींद्र गुरव, लक्ष्मण रावळ, पांडुरंग रावळ, शिवप्रसाद गुरव, आण्णा रावळ, शिवाजी गुरव आदी उपस्थित होते.

सांगवडे (ता. करवीर) येथे श्री नरसिंह जयंती सोहळा निमित्त झालेली गर्दी.
श्री नरसिंहाची जयंतीनिमित्त बांधलेली नरसिंह अवतारातील पूजा.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y58266 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top