
नुतन नागरी बॅंक निर्बंध
शंकरराव पुजारी नुतन नागरी
बॅंकवर आरबीआयचे निर्बंध
इचलकरंजी, ता.१४ - थकीत कर्जामुळे बिघडलेल्या आर्थिक स्थितीमुळे येथील शंकरराव पुजारी नुतन नागरी सहकारी बॅंकतून पैसे काढण्यावर भारतीय रिझर्व्ह बॅंकेने निर्बंध घातले आहेत. निर्देश जारी झाले म्हणजे रिझर्व्ह बॅंकेने बॅंकेचा बॅंकिंग परवाना रद्द केला असे समजू नये. बॅंकेची आर्थिक स्थिती सुधारेपर्यंत निर्देशांनुसार निर्बंधासह बॅंकींग व्यवसाय सुरू ठेवेल, असेही आदेशात म्हटले आहे.
रिझर्व्ह बॅंकेने निवेदनात म्हटले आहे, की १३ मे २०२२ रोजी व्यवसाय बंद झाल्यापासून सहा महिन्यांच्या कालावधींसाठी हे निर्बंध लागू राहतील. आणि ते काही पुनरावलोकनाच्या अधीन आहेत. बॅंकेची सध्याची तरलता स्थिती लक्षात घेता रिझर्व्हे बॅंकेने परिस्थितीनुसार निर्देशानुसार बदल करण्याचे विचार करू शकते. ही बॅंक रिझर्व्हे बॅंकेच्या पूर्वपरवानगीशिवाय इतर निर्बेंधासह कोणतीही कर्जे आणि अग्रीम मंजुर किंवा नुतणीकरण करू शकत नाही. कोणतीही गुंतवणूक करू शकत नाही, दायित्व घेवू शकत नाही. तिच्या मालमत्तेची विल्व्हेवाट लावू शकत नाही. अटींच्या अधिन राहून ठेवींवर कर्जांचे निर्णय घेण्याची परवानगी आहे. सर्व बचत बॅंक किंवा चालू खाते किंवा ठेवीदारांच्या इतर कोणत्याही खात्यातील एकूण शिल्लक रक्कमेतून कोणतीही रक्कम काढण्याची परवानगी दिली जावू शकत नाही.
बॅंकेचे ९९.८४ टक्के ठेवीदार पूर्णपणे डीआयसीजीसी विमा योजनेत समाविष्ठ आहेत. यात पाच लाख रुपयापर्यंतच्या ठेवींचा विमा उतरविला जातो. त्यामुळे ठेवीदारांच्या ठेवींना संरक्षण आहे.
कोट
बॅंकेवर निर्बंध आल्याचे वृत्त खरे आहे. शेवटच्या क्षणापर्यंत ठेवीदारांच्या सर्व ठेवी परत करण्याचा प्रयत्न होता. सध्या प्रशासकांनी कार्यभार घेतला आहे. साधे निर्बंध घातले असून, त्याची मुदत सहा महिन्यासाठी आहे.
-प्रकाश पुजारी, अध्यक्ष शंकरराव पुजारी नुतन नागरी सहकारी बॅंक
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y58269 Txt Kopcity Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..