
पोलिस वृत्त
दुचाकीची चोरी
कोल्हापूर ः राजेश मोटर्स परिसरातून चोरट्याने मोपेड चोरून नेली. हा प्रकार ११ मे रोजी रात्री घडला. याची नोंद शाहूपुरी पोलिस ठाण्यात झाली.
-
हॉटेलच्या
व्यवस्थापकावर
गुन्हा दाख
कोल्हापूर ः हॉटेलमधील २ लाख ७० हजारांची रोकड घेऊन पसार झाल्याप्रकरणी व्यवस्थापकावर शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला. प्रेमनाथ शेट्टी (पूर्ण नाव पत्ता माहित नाही) असे त्या संशयिताचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी सांगितले, की स्टेशनरोडवर एक हॉटेल आहे. या हॉटेलमध्ये संशयित प्रेमनाथ हा व्यवस्थापक कम अकौंउटंट म्हणून काम करतो. कर्मचाऱ्यांच्या वेतनाची रक्कम आणि काऊंटरच्या ड्राव्हरमधील आणि ऑनलाईन जमा झालेली अशी एकूण २ लाख ७० हजाराची रोकड संशयित गुरुवारी (ता.१२) सकाळी घेऊन पळून गेला, अशी फिर्याद संबधित हॉटेल मालकांनी दिली. त्यानुसार गुन्हा दाखल झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
-
मटका कारवाई;
दोघांवर गुन्हे
कोल्हापूर ः हद्दीत सुरू असलेल्या मटका अड्डयावर शाहूपुरी पोलिसांनी कारवाई केली. याप्रकरणी मालकासह दोघांवर गुन्हे दाखल केले. बापू आवळे आणि मालक अजित नाडगोंडा अशी त्या संशयितांची नावे आहेत. कारवाईत दोन हजार ६४२ रूपयांचा मुद्देमाल जप्त केल्याचे पोलिसांनी सांगितले.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y58270 Txt Kopcity Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..