श्रीमंत कोकाटे व्‍याख्यान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

श्रीमंत कोकाटे व्‍याख्यान
श्रीमंत कोकाटे व्‍याख्यान

श्रीमंत कोकाटे व्‍याख्यान

sakal_logo
By

21841

संभाजीराजे गुलामगिरीच्या विरोधात होते
डॉ. श्रीमंत कोकाटे ः जयंतीनिमित्त व्‍याख्यान
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर , ता. १४ ः छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र स्वराज्य रक्षक संभाजीराजे यांनी उपेक्षित, वंचिताना न्याय दिला. महिलांचा आदार केला. प्रजेवर अन्याय होणार नाही याची काळजी घेतली. ते गुलामगिरीच्या विरोधात होते. ज्या काळात डच, फ्रेंच, युरोप अमेरिका आदी देशात स्त्री पुरूषांची खरेदी होत होती त्याकाळाच शिवराय व संभाजीराजेंच्या स्वराज्यात स्त्री पुरूष खरेदी विक्रीवर बंदी घातली. यातून संभाजीराजे यांची नैतिकता दिसते. त्यामुळे शिवराय व संभाजीराजे यांची तुलना जगात कोणाशीही होऊ शकत नाही, असे इतिहास संशोधक डॉ. श्रीमंत कोकाटे यांनी सांगितले.
स्वराज्यरक्षक संभाजीराजे छत्रपती यांच्या जयंती निमित्त डॉ. प्रविण कोडोलीकर यांच्यासह विविध मान्यवरांच्या पुढाकाराने डॉ. कोकोटे यांचे व्याख्यान झाले. यावेळी ते बोलत होते. श्रीमंत शाहू महाराज छत्रपती अध्यक्षस्थानी होते.
कोकाटे म्हणाले,‘ देश एकसंध ठेवायचा असेल तर महापुरूषांचा इतिहास समजून घेण्याची गरज आहे. शिवाजी महाराजांच्या सैन्यात अनेक जाती धर्माचे लोक होते. शिवाजी महाराजांचे राज्य रयतेचे, लोककल्यानकारी राज्य होते. शिवाजी महाराजांचा तोच वारसा त्यांचे पुत्र संभाजीराजे छत्रपती यांनी जपला. संभाजीराजे शुत्रसैन्यावर विजय मिळविणारे अजिंक्य होते. ते एकाच वेळी मोघल, इंग्रज, पोतृगीज अशा अनेकांशी त्यांनी झुंज दिली औरंगजेबाला त्यांनी जेरीस आणले.’’
श्रीमंत शाहू महाराज छत्रपती म्हणाले, ‘‘ शाहू-फुले-आंबेडकर यांच्या विचाराने वाटचाल सुरू आहे, ही समाधानाची बाब आहे. स्वराज्य टिकवताना सर्वांना सोबत घेऊन जाण्याची गरज आहे. समाजात तुकडे करण्याचा प्रयत्न होत आहेत. अशा स्थितीत २१ व्या शतकाती प्रगतीसाठी पाऊले पुढे टाकावी लागतील. ही पावले मागे घेता कामा नये, हाच विचार सर्वांपर्यंत पोहचवला पाहिजे तरच समाज एकत्र व समाधानी राहू शकतो.’’

चौकट
संभाजीराजे र्निव्यसनी, नितीमान
संभाजीराजे र्निव्यसनी होते. पण मद्यपान करणाऱ्यांनी बखरी, कथा, कादंबऱ्या, नाटके लिहिले. संभाजीराजेंची त्यातून बदनामी झाली. मात्र, वा. सी. बेंद्रे, कमल गोखले, डॉ. जयसिंगराव पवार यांनी संभाजीराजे चारित्र्यसंपन्न होते. नितीमान होते. याचा संशोधनात्मक इतिहास लिहिला. सेतू माधव पगडी यांनीही संभाजीराजे नितीमान होते हे लिहिले आहे, असाही संर्दभ डॉ. कोकाटे यांनी दिला.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y58279 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top