
आवश्यक- संक्षिप्त
21851
ख्रिश्चन प्रीमियर लीग
क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन
कोल्हापूर ः ख्रिस्ती युवक मंचच्या वतीने प्रथमच इंटर चर्च क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले आहे. शहरातील विविध चर्चेसचे १६ संघ या स्पर्धेत सहभागी झाले असून, स्पर्धा या नॉकआऊट खेळवल्या जाणार आहेत. स्पर्धेचे उद्घाटन माजी आमदार मालोजीराजे छत्रपती यांच्या हस्ते झाले.
ख्रिस्ती तरुणांसाठी अशा पद्धतीचे क्रिकेट सामने आयोजित केल्याबद्दल त्यांनी मंचचे कौतुक केले. यावेळी नगरसेवक तैफिक मुल्लाणी, दीनानाथ कदम, रेव्हरंट जगन्नाथ हिरवे, रेव्हरंट बी. जे. मोरे, क्रीडा प्रशिक्षक पौल सूर्यवंशी, अॅलन फर्नांडिस, प्रशांत चोपडे, जोशुवा कामत, आशुतोष बेडेकर, अब्राहम वाघमारे, सचिन थोरात, जेम्स कट्टी, यश बेडेकर, अनिष गायकवाड, नितीन काळे, दिनकर जाधव, सुधीर लोंढे, रजनीकांत छोले, संजय आवळे आदी उपस्थित होते.
‘तथागत गौतम बुद्ध’
कादंबरीचे उद्या प्रकाशन
कोल्हापूर ः राजपुत्र सिद्धार्थ ते तथागत गौतम या दीर्घ मनोप्रवासाचं प्रत्ययकारी चित्रण करणाऱ्या एका महत्त्वाच्या कादंबरीचं प्रकाशन मेहता पब्लिशिंग हाऊसतर्फे होणार आहे. ज्येष्ठ लेखक वसंत गायकवाड लिखित ‘तथागत गोतम बुद्ध’ ही कादंबरी असून, सोमवारी (ता.१६) शाहू स्मारक भवनात सायंकाळी सातला प्रकाशन होईल. शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के अध्यक्षस्थानी असतील. मराठी विभागप्रमुख प्रा. डॉ. रणधीर शिंदे यांची प्रमुख उपस्थिती असेल.
............
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y58286 Txt Kolhapur
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..