
पूरग्रस्तांना घरफाळ्यात सवलत ः महापालिका
पूरग्रस्तांना
मिळकतकरात
सवलत
कोल्हापूर ः शहरातील पूरग्रस्तांना त्यांचे ज्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्या प्रमाणात मिळकत करात सवलत दिली जाणार आहे. ही सवलत २०२२-२३ या आर्थिक वर्षांसाठी असून, पुढील महिन्याभरात त्यासाठी अर्ज करावेत, असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे. अग्निशमन दलाच्या टर्नटेबल लॅडरच्या लोकार्पण सोहळ्यावेळी पालकमंत्री सतेज पाटील यांनी पूरग्रस्तांना मिळकत करात सवलत देण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर महापालिकेने याची दखल घेऊन याबाबतचा तपशील समाज माध्यमांवरून जाहीर केला. यातील माहितीनुसार पूरग्रस्तांचे नुकसान किती प्रमाणात झाले आहे त्या प्रमाणात मिळकत करातील सवलत दिली जाईल. ज्याचे नुकसान शंभर टक्के झाले त्यांचा मिळकतकर माफ होईल. तर ज्यांचे त्यापेक्षा कमी नुकसान झाले त्यांना मिळकतकर कमी करण्यात येईल. मिळकत कर सोडून अन्य कोणताही शासकीय कर कमी केला जाणार नाही. ही सवलत २०२२-२३ या आर्थिक वर्षासाठी असणार असून, याबाबतचे अर्ज पुढील महिन्याभराच्या आत करायचे आहेत, असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y58290 Txt Kopcity Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..