पान ४ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पान ४
पान ४

पान ४

sakal_logo
By

21855
कोवाड ः यर्तनहट्टी येथील हातभट्टीवर छापा टाकताना पोलीस.

यर्तनहट्टी येथे हातभट्टीवर छापा
गावठी दारूसह ८० हजार ९०० रुपयाचा मुद्देमाल
कोवाड, ता. १४ : यर्तनहट्टी (ता.चंदगड) येथे बेकायदेशीरपणे सुरु असलेल्या गावठी हातभट्टीवर कोवाड पोलिसांनी आज सकाळी छापा टाकून उदध्वस्त केली. याठिकाणी गावठी दारूसह ८० हजार ९०० रुपयाचा मुद्देमाल जप्त केला. ज्यांच्या शेतात हातभट्टी सुरु होती. त्या साताप्पा आपान्ना सनदी व भिमा यलाप्पा सनदी यांच्यावर पोलिसाना गुन्हा नोंद केला आहे. पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, साताप्पा सनदी व भिमा सनदी यांच्या शेतात बेकायदेशिरपणे गावठी दारु तयार केली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.कोवाड दूरक्षेत्रातील पोलीस नाईक किल्लेदार व कॉस्टेबल अमोल देवकूळे व शिंदे यांनी सापळा रचून छापा टाकला पण आरोपींना पोलिसांची चाहुल लागल्याने ते पसार झाले. पोलिसांनी जागेवर जाऊन छापा टाकला. भट्टीतील मातीची भांडी फोडून हातभट्टी उदध्वस्त केली. छाप्यात 78 हजार रुपये किंमतीचे तीन प्लॅस्टिक बॅरलमध्ये रसायन, २ हजार रुपये किंमतीचे हंडे व इतर साहित्य पोलिसांनी जप्त केले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y58307 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top