
एन.डी. पाटील
60115
डॉ. एन. डी. पाटील फोटो
डॉ. एन. डी. पाटील यांच्या
कार्यावर होणार समग्र ग्रंथ
सरोज पाटील ः आठवणी, फोटो पाठवण्याचे आवाहन
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १६ ः शेतकरी, कष्टकरी वर्गाचे ज्येष्ठ नेते प्रा.डॉ.एन.डी.पाटील यांच्या कार्याचा आढावा घेणारा समग्र ग्रंथ तयार करण्यात येणार आहे. त्यासाठी पूरक ठरणाऱ्या आठवणी, लेख, फोटो ज्यांच्याकडे असतील, त्यांनी प्रतिष्ठानला पाठवावे, जेणेकरून समग्र ग्रंथ तयार करण्यासाठी त्याचा वापर होऊ शकेल, असे आवाहन सरोज पाटील व प्राचार्य डॉ. टी. एस. पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. ते म्हणाले, ‘ज्येष्ठ नेते डॉ. एन.डी.पाटील यांच्या कार्याची ओळख नव्या पिढीला व्हावी म्हणून एन. डी. पाटील प्रतिष्ठानतर्फे दोन ग्रंथ तयार होणार आहेत. या समग्र ग्रंथात एन. डी. पाटील यांच्या कार्याचा आढावा असेल, तर दुसऱ्या ग्रंथात एन. डी. पाटील यांनी विधानसभा, विधान परिषदेत केलेल्या कार्याचा आढावा असणार आहे. त्याची तयारी सुरू झाली आहे. डॉ. पाटील यांनी सामाजिक चळवळी केल्या. शिक्षण क्षेत्रात भरीव योगदान दिले. शेती, सहकार चळवळ, शेतीच्या वीज बिलांचे प्रश्न, सीमालढा, सेझ, टोल विरोधी अशा अनेक सामाजिक लढ्यांचे नेतृत्व केले. यातून राज्याच्या कानकोपऱ्यांतील जनतेशी त्यांचा संपर्क आला. त्यांनी केलेल्या आंदोलनाची तपशीलवार माहिती, फोटो किंवा एन. डी. पाटील यांनी लिहिलेली पत्रे, बातम्यांची कात्रणे अनेकांनी जपून ठेवली आहेत. अशा आठवणी प्रतिष्ठानला द्याव्यात. त्यातील संदर्भ वापरून तसेच छायांकित प्रती काढून त्याच्या मूळ प्रती संबंधितांना प्रतिष्ठानतर्फे परत दिल्या जाणार आहेत. ज्यांच्याकडे काही प्रसंग स्मरणात आहेत. त्यांनी ते लिहून पाठवले तरीही चालतील. प्रा. एन. डी. पाटील प्रतिष्ठान रूईकर कॉलनी, ई वॉर्ड येथे हे साहित्य पाठवता येणार आहे, असेही डॉ. पाटील यांनी सांगितले.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y58512 Txt Kolhapur
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..