केदारी रेडेकर हायस्कूलमध्ये स्नेहमेळावा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

केदारी रेडेकर हायस्कूलमध्ये स्नेहमेळावा
केदारी रेडेकर हायस्कूलमध्ये स्नेहमेळावा

केदारी रेडेकर हायस्कूलमध्ये स्नेहमेळावा

sakal_logo
By

केदारी रेडेकर हायस्कूलमध्ये स्नेहमेळावा
भादवणः पेद्रेवाडी (ता. आजरा) येथील केदारी रेडेकर हायस्कूलमध्ये २००४ च्या दहावीच्या बॅचचा स्नेहमेळावा उत्साहात झाला. केदारी रेडेकर शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा अंजनाताई रेडेकर अध्यक्षस्थानी होत्या. विद्यार्थ्यांनी शाळेला ध्वनीक्षेपक यंत्रणा भेट दिली. रेडेकर म्हणाल्या, ‘‘शाळेतील गुरुजनांच्याकडून मिळालेल्या शिदोरीने जीवनात वाटचाल करणे सुखकर होते. ही शिदोरी आयुष्यात मार्ग दाखवते. विद्यार्थ्यांनी जपलेल्या शालेय जीवनातील आठवणी आयुष्याला दिशा देण्यास मदतगार ठरतात.’’ मुख्याध्यापक चव्हाण यांचेही भाषण झाले. जाधव, मोहनगेकर, देऊसकर, पाटील व विद्यार्थ्यांनी या वेळी मनोगतात शाळेबद्दल ऋण व्यक्त केले. सरीता जाधव (गाडे) व सुषमा पाटील (येजरे) यांनी सुत्रसंचालन केले. सोनल जाधव, सुहास डोंगरे, शेखर पंडीत, विवेक येजरे, किरण करडे, चंद्रकांत जाधव यांनी नियोजन केले. जयप्रकाश होडगे यांनी आभार मानले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y58539 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top