
हुल्लडबाजीने फुटबॉलला गालबोट
फोटो योगेशकडून घेणे.......
कोल्हापूर ः हुल्लडबाजी करणाऱ्या तरुणांना कारवाईचा इशारा देताना पोलिस.
हुल्लडबाजीने गालबोट;
केएसएचे कारवाईचे संकेत
कोल्हापूर : अंतिम सामन्याला हुल्लडबाजीने गालबोट लागले. शिवाजी पेठ विरुद्ध मंगळवार पेठ अशी ईर्ष्या मनात ठेवून आलेल्या काही हुल्लडबाज प्रेक्षकांनी मैदानावर बाटल्या भिरकावल्या. बाटली लागल्याने एक बॉलबॉय जखमी झाला.
शिवीगाळ, असभ्य हावभाव, खेळाडूंसह मैदानावर बाटल्या भिरकावण्याचा प्रकार अंतिम सामान्यादरम्यान घडला. पारंपरिक प्रतिस्पर्धी शिवाजी तरुण मंडळ विरुद्ध दिलबहारच्या सामन्यात खेळाडूंपेक्षा हुल्लडबाजी करण्यासाठी आलेल्या दोन्ही बाजूच्या प्रेक्षकांमध्ये अधिक खुन्नस दिसून आली. याचा परिणाम सामन्याच्या सुरुवातीपासून झाला. सामना सुरू झाल्यानंतर काही वेळाने प्रेक्षकांनी हुर्रे उडवली. नंतर विरुद्ध संघातील खेळाडू मैदानाच्या प्रेक्षक गॅलरीच्या कोपऱ्याकडे आल्यावर बाटल्या फेकण्यात येत होत्या. हुल्लडबाजीत भान हरपलेले हे प्रेक्षक नंतर दिसेल त्याला आपले लक्ष्य करू लागले. यातील एक बाटली मैदानाबाहेर उभारलेल्या लहान बॉलबॉयच्या खांद्यावर पडल्याने तो जखमी झाला. अचानक पाठीमागून पडलेल्या बाटलीमुळे तो मैदानावरच पडला. त्याला बाजूला नेण्यात आले. सहाय्यक पंच प्रदीप साळोखे यांच्या पायाजवळ काचेचा ग्लास पडला. पोलिसांनी प्रेक्षक गॅलरीमध्ये जाऊन काही हुल्लडबाजांना पोलिसी खाक्या दाखवला; पण त्याचा फारसा उपयोग झाला नाही. या प्रकारामुळे सामन्यात व्यत्यय येत होता. एकीकडे मैदानावर या वस्तू घेऊन येण्यास परवानगी नसताना त्या आत आल्याच कशा, याचा शोध घेणे गरजेचे आहे. सामन्यानंतर झालेल्या प्रकाराचे सीसीटीव्ही फुटेज बघून कारवाई करण्याचे संकेत केएसएने दिले आहेत.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y58550 Txt Kolhapur1
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..