खेळ पराभव पचवायला शिकवतो ः डॉ. रविंद्र हत्तरकी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खेळ पराभव पचवायला शिकवतो ः डॉ. रविंद्र हत्तरकी
खेळ पराभव पचवायला शिकवतो ः डॉ. रविंद्र हत्तरकी

खेळ पराभव पचवायला शिकवतो ः डॉ. रविंद्र हत्तरकी

sakal_logo
By

22130
गडहिंग्लज : युनायटेड फुटबॉल प्रशिक्षण शिबिर समारोपात शिबिरार्थींना प्रमाणपत्र देताना डॉ. सावंत. सोबत डॉ. हत्तरगी, सुरेश कोळकी, मुरारी चिकोडे, अरविंद बार्देस्कर आदी.(आशपाक किल्लेदार : सकाळ छायाचित्रसेवा)

खेळ पराभव पचवायला शिकवतो
डॉ. रवींद्र हत्तरकी; ‘गडहिंग्लज युनायटेड’च्या शिबिराचा समारोप
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. १६ : मैदानी खेळांचे अनेक फायदे आहेत. खेळाडूला नैसर्गिक तंदुरुस्त आरोग्य लाभते. विशेषतः खेळ विजयाबरोबरच पराभव पचवायला शिकवतो. आजच्या तीव्र स्पर्धेच्या युगात ही बाब सर्वाधिक महत्त्वाची आहे. त्यामुळे नवोदित खेळाडूंनी केवळ शिबिरापुरतेच नाही, तर आयुष्यभर खेळाडू म्हणून राहिल्यास जीवनात अधिक यशस्वी व्हाल, असा कानमंत्र प्रसिध्द अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. रवींद्र हत्तरगी यांनी दिला. ते येथील गडहिंग्लज युनायटेड फुटबॉल असोसिएशनच्या पंधरा दिवसांच्या उन्हाळी प्रशिक्षण शिबिराच्या समारोपात बोलत होते. एम. आर. हायस्कूलच्या मैदानावर झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ खेळाडू महादेव पाटील होते.
प्रशिक्षण शिबिर समन्वयक ओमकार सुतार यांनी स्वागत केले. युनायटेडचे सचिव दीपक कुपन्नावर यांनी प्रास्ताविकात शिबिरातील फुटबॉलसह वॉर्मअप, पोहणे, ट्रेकिंग, आहार यांचा आढावा घेतला. डॉ. हत्तरगी म्हणाले, ‘‘आजच्या मोबाईल, कॉम्प्युटरच्या युगात मैदानी खेळांची आवश्यकता पूर्वीच्या तुलनेत वाढली आहे. त्यामुळे लहान मुलांना खेळाची गोडी लावण्यासाठी शिबिरे गरजेची आहेत.’’
डॉ. शैलेंद्र सावंत, उद्योजक मुरारी चिकोडे, संभाजी शिवारे यांच्या हस्ते प्रशिक्षार्थींचा प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. उत्कृष्ट शिबिरार्थी म्हणून आकाश पाटील, राजवीर शिंदे, संदीप हिरकुडी, समन्वयक ओमकार सुतार यांचा किट देऊन सत्कार करण्यात आला. या वेळी दाजीबा लाड, संजय पाटील, गणेश बुरुड, ओमकार जाधव, प्रसन्न प्रसादी, यासीन नदाफ यांच्यासह खेळाडू, पालक उपस्थित होते. युनायटेडचे संचालक अरविंद बार्देस्कर यांनी आभार मानले.
---------------
कोट
कोरोनामुळे शिक्षणासाठी अनपेक्षितपणे लहान मुलांच्या ताब्यात मोबाईल आला आहे. मुलांनी त्याचा योग्य तेवढाच वापर करून मैदानी खेळातून ऊर्जा वाढवावी.
- सुरेश कोळकी, संचालक युनायटेड

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y58624 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top