कल्लाप्पाण्णा आवाडे पुरस्कार प्रदान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कल्लाप्पाण्णा आवाडे पुरस्कार प्रदान
कल्लाप्पाण्णा आवाडे पुरस्कार प्रदान

कल्लाप्पाण्णा आवाडे पुरस्कार प्रदान

sakal_logo
By

22217
-----
कल्लाप्पाण्णा आवाडे यांना पुरस्कार प्रदान
इचलकरंजी, ता. १६ ः भविष्याचा वेध घेत श्रीमंत मालोजीराजे नाईक-निंबाळकर यांच्या दूरदृष्टिकोनातून सातारा जिल्हा सुजलाम सुफलाम बनला आहे. त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ कल्लाप्पाण्णा आवाडे आणि आमदार जगन्नाथ शिंदे यांना पुरस्कार प्रदान करून खऱ्या अर्थाने पुरस्काराचा गौरव केला आहे, असे प्रतिपादन सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी काढले.
फलटण (जि. सातारा) येथील श्रीमंत मालोजीराजे सहकारी बँक आणि श्रीमंत मालोजीराजे स्मृती प्रतिष्ठान यांच्यावतीने जवाहर सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक चेअरमन कल्लाप्पाण्णा आवाडे, तसेच अखिल भारतीय केमिस्ट अ‍ॅन्ड ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष आमदार जगन्नाथ शिंदे यांना यंदाच्या श्रीमंत मालोजीराजे स्मृती पुरस्कार प्रदान सोहळ्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर होते.
रामराजे नाईक-निंबाळकर म्हणाले, ‘सहकाराच्या माध्यमातून कल्लाप्पाण्णा आवाडे यांनी उभारलेले विकासाचे पर्व आणि औषध क्षेत्रात जगन्नाथ शिंदे यांनी केलेले कार्य निश्‍चितच कौतुकास्पद आहे. वस्त्रनगरीला आधुनिकतेच्या वळणावर नेण्यासह तेथील संस्कृती टिकवण्याचे काम आजही श्री. आवाडे यांच्याकडून अविरतपणे केले जात आहे.’ मालोजीराजे सहकारी बँकेचे चेअरमन श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी स्वागत केले. आमदार प्रकाश आवाडे यांनी माजी खासदार श्री. आवाडे यांच्या राजकीय, सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रातील कार्याचा आढावा घेतला.
नगरसेविका सुभद्राराजे नाईक-निंबाळकर, सौ. शिवांजली नाईक निंबाळकर, सौ. योगिनी पोकळे, सौ. निवेदिता नाईक-निंबाळकर, जवाहर कारखान्याचे माजी चेअरमन उत्तम आवाडे, बाबासो चौगुले, बाळासाहेब कलागते, सतीश कोष्टी आदी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y58705 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top