शाहू मिलमध्ये आजपासून आयटी एक्स्पो | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शाहू मिलमध्ये आजपासून आयटी एक्स्पो
शाहू मिलमध्ये आजपासून आयटी एक्स्पो

शाहू मिलमध्ये आजपासून आयटी एक्स्पो

sakal_logo
By

शाहू मिलमध्ये
आजपासून आयटी एक्स्पो
कोल्हापूर, ता. १६ : छत्रपती शाहू महाराजांनी उद्योगांबरोबरच जलसिंचनासाठी मोठे कार्य केले. त्यातूनच कोल्हापूरचा विकास झाला. या पार्श्वभूमीवर राजर्षी शाहू महाराजांच्या स्मृती शताब्दीनिमित्त लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृतज्ञता पर्वांतर्गत शाहू मिलमध्ये आयटी असोसिएशनतर्फे आयटी एक्सपो २०२२ होणार आहे. त्यामध्ये कोल्हापुरातील आयटी क्षेत्रातील व हार्डवेअर क्षेत्रातील शंभराहून अधिक कंपन्या भाग घेणार आहेत. उद्या (मंगळवार) पासून सलग दोन दिवस सकाळी दहा ते रात्री आठ या वेळेत हे प्रदर्शन होणार आहे. येथील आयटी कंपन्यांची माहिती यानिमित्ताने एकाच छताखाली मिळणार आहे. नावीन्यपूर्ण संशोधन सुरू करण्यासाठी इनक्युबेटर संस्थांची माहितीही उपलब्ध होणार आहे. प्रदर्शनाचा सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहन असोसिएशनने केले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y58825 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top