
प्रत्यय नाट्य महोत्सव आजपासून
प्रत्यय नाट्य
महोत्सव आजपासून
कोल्हापूर, ता. १६ ः येथील प्रत्यय हौशी नाट्य संस्थेतर्फे उद्या (मंगळवार) पासून प्रत्यय नाट्य महोत्सवाचे आयोजन केले आहे. सलग तीन दिवस राजर्षी शाहू स्मारक भवनात सायंकाळी सातला प्रयोग होणार असून माफक शुल्कातील प्रवेशिका शाहू स्मारकवर उपलब्ध केल्या असल्याची माहिती संस्थेने प्रसिद्धीस दिली आहे. मंगळवार (ता. १७) दिलीप धोंडो कुलकर्णी लिखित, आदित्य खेबुडकर दिग्दर्शित ‘उत्तररामचरित’ या नाटकाचा प्रयोग होईल. प्रत्यय संस्थेचे सादरीकरण असेल. बुधवारी (ता. १८) सप्तरंगी प्लॅटफॉर्म निर्मित, आकांक्षा रंगभूमी पुणे प्रस्तुत ‘कुरूप’ या नाटकाचा प्रयोग होईल. ट्रान्सजेंडर कवयित्री दिशा पिंकी शेख यांच्या निवडक कवितांवर हा प्रयोग बेतला आहे. जमीर कांबळे यांचे दिग्दर्शन आहे. गुरुवार (ता. १९) ‘मार्क्स इन सोहो’ हा प्रयोग होईल. साहिल कल्लोळी यांचा अनुवाद असून डॉ. शरद भुथाडिया यांचे दिग्दर्शन असेल. लोकराजा राजर्षी शाहू महाराजांच्या स्मृतिशताब्दी वर्षात त्यांच्या कार्याला व विचारांना सलाम म्हणून हा महोत्सव होत असून कोल्हापूरकरांनी सहभागी व्हावे, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y58831 Txt Kopcity Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..