
आयकॉन स्टील
२२३०९
बांधकाम कॉन्ट्रॅक्टरना
‘आयकॉन स्टील’कडून प्रशिक्षण
कोल्हापूर, ता. १६ ः बांधकाम क्षेत्रातील समीकरणे दिवसेंदिवस बदलत चालली आहेत. प्रत्येक माणसाला आधुनिक शैली आणि रचनेनुसार घर, बंगला, इमारत, अर्पाटमेंट हवे असते. मजबूत आणि दर्जेदार वास्तू उभारणीत बांधकाम कॉन्ट्रॅक्टर व मिस्त्रींचा महत्त्वाचा वाटा असतो. या दोघांना आधुनिक कौशल्य प्रशिक्षण मिळाल्यास ते आकर्षक प्रोजेक्ट निर्माण करू शकतात म्हणून ‘आयकॉन स्टील’च्या वतीने मेळाव्याद्वारे प्रशिक्षण देण्यात येत आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील कुरुंदवाड, यड्राव, चिपरी, मुधाळतिट्टा; सांगलीतील आष्टा, माडग्याळ, उमदी, ढालगाव, जत, पलूस, विटा व रत्नागिरी उमरोली येथे ‘आयकॉन स्टील’च्या सहकार्याने कॉन्ट्रॅक्टर मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी मेळाव्याला बांधकाम कॉन्ट्रॅक्टर, मिस्त्री यांच्यासह बांधकाम व्यावसायिकांची लक्षणीय उपस्थिती होती. या मेळाव्यात बांधकामाविषयीच्या आधुनिक तंत्रज्ञानासंबंधी माहिती देण्यात आली. ‘आयकॉन स्टील’कडून सुरू करण्यात आलेला हा स्तुत्य उपक्रम आमच्यासाठी मार्गदर्शक ठरत असल्याच्या प्रतिक्रिया यावेळी बांधकाम कॉन्ट्रॅक्टर यांनी व्यक्त केल्या. ‘आयकॉन स्टील’ हे एक दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण स्टील असून त्याची डीएस दर्जा असलेली सळई बांधकामाला अधिक टिकाऊ बनविण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरत असल्याचे कॉन्ट्रॅक्टर व मिस्त्रींनी सांगितले. स्टीलची लांबी, मानक आकार; तसेच दोन बारमध्ये सोडण्यात येणारे अंतर आणि सळईची बांधणी कशी असावी आदींबाबत मेळाव्यात सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. ‘आयकॉन स्टील’कडून पर्यावरणसंरक्षणाचे कार्य देखील मोठ्या प्रमाणात करण्यात येत असून त्याबाबत देखील या मेळाव्यात माहिती देण्यात आली.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y58832 Txt Kolhapur
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..