पोलिस वृत्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पोलिस वृत्त
पोलिस वृत्त

पोलिस वृत्त

sakal_logo
By

मारहाणप्रकरणी तिघांवर गुन्हा
कोल्हापूर ः जमीन वादातून जाब विचारण्‍यास हॉटेलमध्ये आलेल्या तिघांनी हॉटेलमालक व कामगार महिलेस मारहाण केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल झाला. मार्केट यार्ड येथे काल सायंकाळी ही घटना घडली. संशयित अकबर हुसेनसाब गोठेवाले (वय ५०), हुसेन अकबर गोठेवाले (२३), अनिस अकबर गोठेवाले (२०, सर्व मुक्तसैनिक वसाहत) यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याची माहिती शाहूपुरी पोलिसांनी दिली. याबाबतची फिर्याद अरबाज नजीर गोठेवाले (मणेरमळा) यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात दिली.

मोरेवाडीत महिलेची आत्महत्या
कोल्हापूर ः मोरेवाडी (ता. करवीर) येथील ज्योती विनायक पाटील (वय ४३) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांचे पती बसचालक असून, मुलगा बांधकाम मजूर आहे. घरी कोणी नसताना त्यांनी आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली. याची नोंद करवीर पोलिस ठाण्यात झाली. आत्महत्येचे कारण समजू शकले नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

टेंबलाईवाडीत हाणामारीत तरुण जखमी
कोल्हापूर ः टेंबलाईवाडी येथील बीअर शॉपीजवळ किरकोळ कारणावरून काल रात्री हाणामारी झाली. यात अभिजित विभूते (वय ३२) हा तरुण जखमी झाला. रात्रीसाडेबाराच्या सुमारास ही घटना घडली. त्याला सीपीआरमध्ये दाखल केले असून, तेथील पोलिस चौकीत याची नोंद झाली आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y58846 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top