
कानोली सेवा संस्थेत सत्ताधारी गटाची सत्ता
कानोली सेवा संस्थेत
सत्ताधारी गटाची सत्ता
भादवण, ता. १७ ः कानोली (ता. आजरा) येथील श्री कानोली विकास सेवा संस्थेवर सत्ताधारी श्री गणेश शेतकरी विकास पॅनेलने एकहाती सता मिळवली. ‘भैरवनाथ परिवर्तन शेतकरी विकास आघाडी’ या विरोधी गटाला एकही जागा मिळाली नाही. निवडणूक चुरशीने झाली. श्री गणेश शेतकरी आघाडीचे विजयी उमेदवार असे ः परशुराम महादेव आपगे, लक्ष्मण यशवंत देसाई, दिलीप पंडित पाटील, पंडित रघुनाथ पाटील, मारुती आप्पा पाटील, राजेंद्र पंडितराव पाटील, शिवाजी लखोबा पाटील, पांडुरंग राजाराम भोसले (सर्वसाधारण खातेदार कर्जदार प्रतिनिधी गट). बनाबाई दत्तात्रय पाटील, अलका रमेश भोगण (महिला प्रतिनिधी गट), राजेंद्र दशरथ मुरुकटे (इतर मागास प्रवर्ग प्रतिनिधी गट). यापूर्वी या पॅनेलचे विलास धोंडिबा कांबळे (अनुसूचित जाती-जमाती प्रवर्ग प्रतिनिधी गट), अजित रामचंद्र गंधवाले (विमुक्त जाती, भटक्या जमाती प्रवर्ग प्रतिनिधी गट) हे बिनविरोध निवडून आले आहेत.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y58850 Txt Kopdist Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..