युवा वर्ग भाजपकडे ः चंद्रकांत पाटील | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

युवा वर्ग भाजपकडे ः चंद्रकांत पाटील
युवा वर्ग भाजपकडे ः चंद्रकांत पाटील

युवा वर्ग भाजपकडे ः चंद्रकांत पाटील

sakal_logo
By

२२३२९

युवा वर्ग भाजपकडे आकर्षित
प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील; युवा मोर्चाची कार्यकारिणी जाहीर

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १६ ः आंतरराष्ट्रीय पातळीवरही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाचे नाव उच्च शिखरावर नेले आहे. देशात उद्योग, रोजगारनिर्मिती मोठ्या प्रमाणात होत आहे. देशात प्रगतीचे वारे वाहत आहेत. भाजपच्या नेतृत्वाखाली युवकांना आपले भविष्य उज्ज्वल दिसत असल्याने युवा वर्ग भाजपकडे मोठ्या संख्येने आकर्षित होत आहे, असे प्रतिपादन भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले. त्यांच्या उपस्थितीत युवा मोर्चात तरुणांनी प्रवेश केला. यावेळी ते बोलत होते.
चंद्रकांत पाटील म्हणाले, ‘‘आंतरराष्ट्रीय पातळीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताचे विविध क्षेत्रांतील स्थान शिखराला नेले आहे. तसेच देशात विविध नवनवीन योजनांच्या माध्यमांतून अनेक लोकांना रोजगार, उद्योगासाठी भांडवल व इतर सुविधा सामान्य नागरिकांसाठी उपलब्ध करून दिल्या आहेत. या सर्व गोष्टी लक्षात घेऊन युवा वर्गाचे आकर्षण भाजपच्या दिशने वाढू लागल्याचे चित्र दिसत आहे. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत भाजपला वैयक्तिक ७८ हजारपेक्षा जास्त मते मिळवण्यात यश आले आहे. यातून एक गोष्ट समोर येते की लोकांचा कल भाजपकडे वळत आहे.’
भाजपचे जिल्हाध्यक्ष (महानगर) राहुल चिकोडे, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष विजयसिंह खाडे-पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.

युवा मोर्चाचे नवे पदाधिकारी
पारस महेश पलीचा (सरचिटणीस), विजय सुभाष दरवान (उपाध्यक्ष), विशाल राजेंद्र शिरळकर (उपाध्यक्ष), ओंकार अविनाश गोसावी (वॉर्ड अध्यक्ष), प्रयास दत्तात्रय भोसले (विद्यार्थी संयोजक - शिवाजी विद्यापीठ), प्रसाद बाबूराव पाटोळे (आत्मनिर्भर भारत संयोजक), हर्षांक जयंत हरळीकर (शाहूपुरी मंडल अध्यक्ष), प्रणव किरण पवार (युवा वॉरीयर्स संयोजक), नितीश कुलकर्णी (सोशल मीडिया संयोजक)

.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y58874 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top