कोल्हापूर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कोल्हापूर
कोल्हापूर

कोल्हापूर

sakal_logo
By

लक्षतीर्थ वसाहतीत
एकावर खुनी हल्ला
परिसरात तणाव; वर्चस्ववादातून कृत्य
कोल्हापूर, ता. १७ ः लक्षतीर्थ वसाहत येथील सासने कॉलनीत वर्चस्ववादातून झालेल्या खुनी हल्ल्यात एक जण गंभीर जखमी झाला. संतोष सोनबा घोडके (वय ४०) असे त्याचे नाव आहे. दरम्‍यान, अतिरक्तस्त्राव होऊन त्याची प्रकृती गंभीर बनली आहे. दरम्यान, वर्चस्ववादातून दोन गटातील वाद धुमसत आहे. काल रात्री साडेअकराच्या सुमारास संशयित हल्लेखोरांनी संतोष बोडके याच्यावर खुनी हल्ला केला. घटनास्थळी रक्ताचे थारोळे साचले होते. काठी आणि दगडं टाकून हल्लेखोर पसार झाले. कृष्णात कोंडिबा बोडेकर (वय ३५) हादेखील गंभीर जखमी झाला.
याबाबत मिळालेली माहिती अशी, वाढदिवसाच्या निमित्ताने लावलेले पोस्टर फाडण्याच्या कारणातून ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली. जखमी बोडके याच्या नातेवाइकांसह लक्षतीर्थ वसाहतीमधील तरुणांची शासकीय रुग्णालय आवारात रात्री उशिरा गर्दी झाली होती. त्यामुळे रुग्णालयाच्या आवारातही खबरदारीचा उपाय म्हणून पोलिस बंदोबस्त तैनात केला आहे. जखमी संतोष बोडके याला शासकीय रुग्णालयात दाखल केले. तलवारीसह अन्य शस्त्रांनी डोक्यात, पाठीवर, हातावर वर्मी हल्ला केला. संतोष रक्ताच्या थारोळ्यात कोसळल्यानंतर हल्लेखोर पसार झाले. किमान पाच ते सहा जणांनी हल्ला केल्याचे सांगण्यात आले. सहायक फौजदार भगवान गिरीगोसावी, हवालदार संजय कोळी यांच्यासह पोलिस घटनास्थळी दाखल झाले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y58879 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top