तारदाळला आजी माजी सैनिकांचा सत्कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तारदाळला आजी माजी सैनिकांचा सत्कार
तारदाळला आजी माजी सैनिकांचा सत्कार

तारदाळला आजी माजी सैनिकांचा सत्कार

sakal_logo
By

22357
-----------------
तारदाळला आजी-माजी सैनिकांचा सत्कार
तारदाळ, ता. १७ : येथील राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्मृतिशताब्दी महोत्सवानिमित्त विठ्ठल मंदिरात आजी-माजी सैनिक, तसेच वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा सत्कार केला.
तारदाळ येथील सदाशिव खोत यांच्या प्रेरणेतून कार्यक्रम झाला. बेलेवाडी मासा (ता. कागल) येथील शहीद झालेले सात्ताप्पा पाटील यांच्या स्मरणार्थ मातोश्री आनंदी, वडील महादेव यांनी गावामध्ये शाळेच्या उभारणीस हातभार लावला. याद्वारे जिल्ह्याला प्रेरणा व आदर्श घालून देणाऱ्या या दाम्पत्यांचा सत्कार करण्यात आला. तारदाळमधील ४० आजी-माजी सैनिकांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते केला. राष्ट्रसेवा दलाचे बाबासाहेब नदाफ, शशिकांत मुद्दापुरे, शामराव कुलकर्णी आदींनी तारदाळ परिसरात वेगळा उपक्रम राबवल्याबद्दल गौरवोद्‍गार काढले. प्रसाद खोबरे, अंजना शिंदे, सरपंच यशवंत वाणी, उपसरपंच मृत्युजंय पाटील, नंदकिशोर भुतडा, तारदाळ पतसंस्थेचे चेअरमन के. जी. पाटील, पंचगंगा कारखान्याचे संचालक प्रकाश खोबरे, वसंत चौगुले, तंटामुक्ती अध्यक्ष जयप्रकाश भगत आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन गजानन खोत, दिलीप खोत, सुशांत भंडारे यांनी केले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y58909 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top