लक्ष्मी संस्थेच्या अध्यक्षपदी देसाई | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

लक्ष्मी संस्थेच्या अध्यक्षपदी देसाई
लक्ष्मी संस्थेच्या अध्यक्षपदी देसाई

लक्ष्मी संस्थेच्या अध्यक्षपदी देसाई

sakal_logo
By

22362
चंद्रसेन देसाई
22363
अशोक बाचूळकर

लक्ष्मी संस्थेच्या अध्यक्षपदी देसाई
कोवाड, ता. १७ : कागणी (ता. चंदगड) येथी श्री लक्ष्मी विकास सेवा संस्थेच्या अध्यक्षपदी चंद्रसेन वसंतराव देसाई यांची, तर उपाध्यक्षपदी अशोक भरमू बाचूळकर यांची बिनविरोध निवड झाली. एम. व्ही. पाटील यांच्या अध्यक्षस्थानी संस्थेच्या कार्यालयात निवडीचा कार्यक्रम झाला.
संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीत श्री. महालक्ष्मी शेतकरी विकास आघाडीने श्री जय हनुमान शेतकरी विकास परिवर्तन आघाडीचा पराभव करून संस्थेवर सत्ता स्थापन केली. अध्यक्षपदासाठी देसाई यांचे नाव अशोक भोगण यांनी सुचविले, तर महादेव पाटील यांनी अनुमोदन दिले. उपाध्यक्ष पदासाठी अशोक बाचूळकर यांचे नाव लक्ष्मण खाडे यांनी सुचविले. त्याला संजय देसाई यांनी अनुमोदन दिले. अध्यक्ष देसाई व उपाध्यक्ष बाचूळकर यांनी संस्थेच्या प्रगतीसाठी सर्वांना बरोबर घेऊन काम करणार असल्याचे सांगितले. या वेळी संजय प्रल्हाद देसाई, कृष्णराव रावसो देसाई, अरुण शंकर देसाई, लक्ष्मण नरसू खाडे, अशोक सुबराव भोगण, महादेव रामचंद्र पाटील, सुरेखा जनार्दन देसाई, कांचन बळीराम किल्लेदार, नरसिंग कृष्णा परीट, सहदेव ईराप्पा कांबळे, अमृत तुकाराम पाटील यांचा सत्कार झाला. सचिव सागर राजगोळकर यांनी आभार मानले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y58918 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top