
रहायला जागा देवून जपली माणुसकी
22364
कोवाड : कडलगे खुर्द येथील रुक्मिणी पाटील यांचे घर.
राहायला जागा देऊन
जपली माणुसकी
कोवाड, ता. १७ : कडलगे खुर्द (ता. चंदगड) येथील जोतिबा रामू पाटील यांचे घर आगीत भस्मसात झाल्याने जोतिबा पाटील यांच्यासमोर निवाऱ्याचा प्रश्न उभा होता; पण रुक्मिणी कृष्णा पाटील या निराधार महिलेने आपल्या छोट्याशा पाटील कुटुंबीयाला घरात तात्पुरता आसरा देऊन माणुसकी जपली.
आगीत संपूर्ण घर जळाल्याने अंगावरच्या कपड्यांशिवाय जोतिबा पाटील यांच्याकडे काहीच शिल्लक राहिले नाही. मुळात जोतिबा पाटील हे भूमिहीन आहेत. मोलमजुरी करून ते कुटुंब चालवितात. अशात त्यांचे घर जळाले. जळालेले घर उभे करेपर्यंत राहायचे कुठे, या विवंचनेत असताना शेजारीच राहणाऱ्या रुक्मिणी पाटील या निराधार महिलेने त्यांना आपल्या छोट्याशा घरात आसरा देऊन माणुसकी जपली आहे. रुक्मिणी पाटील यांनाही प्रधानमंत्री आवास योजनेतून हे घर मंजूर झाले आहे. त्यामुळे संसार उघड्यावर पडलेल्या पाटील कुटुंबाला आसरा देण्याची जबाबदारी आपली असल्याच्या भावनेतून पाटील कुटुंबीयांची आपल्या घरी राहण्याची त्यांची व्यवस्था केल्याचे रुक्मिणी पाटील यांनी सांगितले.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y58919 Txt Kopdist Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..