माजी विद्यार्थ्यांकडून गुरुमाऊलींचा वाढदिवस | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

माजी विद्यार्थ्यांकडून गुरुमाऊलींचा वाढदिवस
माजी विद्यार्थ्यांकडून गुरुमाऊलींचा वाढदिवस

माजी विद्यार्थ्यांकडून गुरुमाऊलींचा वाढदिवस

sakal_logo
By

22436
हिटणी : प्राथमिक शाळेत गुरुवर्या रत्नमाला मरीगुद्दी यांना मानपत्र प्रदान करताना कांचन पाटील, बसगोंडा पाटील, चंद्रकांत जोशी आदी.

माजी विद्यार्थ्यांकडून
गुरुमाऊलींचा वाढदिवस
गडहिंग्लज : हिटणी (ता. गडहिंग्लज) येथील श्रीमती रत्नमाला मरीगुद्दी या गुरुमाऊलींचा ८३ वा वाढदिवस शाळेच्या प्रांगणात माजी विद्यार्थ्यांकडून साजरा करण्यात आला. या वेळी माजी विद्याथ्यार्थ्यांसह प्रतिष्ठित नागरिक व नातेवाईकांची उपस्थिती होती. माजी सरपंच वरदशंकर वरदापगोळ अध्यक्षस्थानी होते. बसगोंडा पाटील यांनी कार्यक्रमाचा हेतू स्पष्ट केला. चंद्रकांत जोशी यांनी प्रास्ताविकात मरीगुद्दी यांच्याविषयीच्या आठवणींना उजाळा दिला. शिवाप्पा वाळकी, मारुती कलकुटगी यांची भाषणे झाली. रावसाहेब मुरगी यांनी मानपत्राचे वाचन केले. कांचन पाटील यांच्या हस्ते श्रीमती मरीगुद्दी यांचा शाल, श्रीफळ, मानपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. राजेंद्र दानापगोळ यांनी आभार मानले. मुख्याध्यापक रामचंद्र मुगळी, शिक्षक उपस्थित होते. अशोक वरदापगोळ, बसगोंडा पाटील व माजी विद्यार्थ्यांनी नियोजन केले होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y59000 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top