
पाणीपुरवठा
22458
पुईखडी जलशुद्धीकरण केंद्रातून
काढला ५८८७ घनफूट गाळ
कोल्हापूर, ता. १७ ः पुईखडी जलशुद्धीकरण केंद्रातील गाळ काढण्याच्या कामास आजपासून सुरुवात झाली. एका टाकीतील गाळ काढण्याचे काम पूर्ण झाले असून, दिवसभरात ५८८७ घनफूट गाळ काढला. बुधवारी दुसऱ्या टाकीचे काम हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे गुरुवारपर्यंत ए, बी, ई वॉर्ड तसेच संलग्न उपनगरे, ग्रामीण भागास कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. दिवसभरात सर्व भागांत अपुरा पाणीपुरवठा झाल्याने टॅंकरचा उपयोग करण्याची गरज भासली नाही.
दोन वर्षे कोरोनामुळे जलशुध्दीकरण केंद्रातील गाळ काढण्यात आला नव्हता. यंदा पावसाळ्यापूर्वी गाळ काढला जात आहे. गुरुवार संप आणि पंप हाऊसमधील गाळ काढण्यात येणार आहे. पहिल्या सेटलिंग टाकीत साधारणत: दोन ते तीन फूट गाळ साचला होता. हा गाळ १५ कर्मचारी व दोन फायर फायटरच्या साहाय्याने काढण्यात आला. जल अभियंता हर्षजित घाटगे व शाखा अभियंता प्रिया पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली काम सुरू केले आहे. ‘एबीई’ वॉर्ड, संलग्न उपनगरे, ग्रामीण भागात आज दिवसभर कमी दाबाने पाणीपुरवठा झाला. कुठे पाणी आलेच नाही, असे झाले नसल्याचे पाणीपुरवठा विभागाने सांगितले. त्यामुळे टॅंकरद्वारा पाणीपुरवठ्याची मागणीही आलेली नाही. आणखी दोन दिवस अशीच परिस्थिती राहणार आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y59008 Txt Kopcity Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..