अविवाहीत ३० वर्षावरील युवकांना आर्थिक मदत करा : दिपक पाटील | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अविवाहीत ३० वर्षावरील युवकांना आर्थिक मदत करा : दिपक पाटील
अविवाहीत ३० वर्षावरील युवकांना आर्थिक मदत करा : दिपक पाटील

अविवाहीत ३० वर्षावरील युवकांना आर्थिक मदत करा : दिपक पाटील

sakal_logo
By

अविवाहीत ३० वर्षावरील युवकांना
आर्थिक मदत करा : दिपक पाटील
मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली मागणी
कोवाड, ता. १८ ः ग्रामीण भागात लग्नासाठी शेतकरी मुलगा नको, अशी नकारात्मकता वाढत आहे. त्यामुळे शेतकरी युवकांना लग्नासाठी मुली मिळणे मुस्किल झाले आहे. विवाह न झाल्याने त्यांच्यात नैराश्य वाढत आहे. अशा अविवाहीत ३० वर्षावरील युवकांना महाराष्ट्र शासनाने दहा लाखाची आर्थिक मदत करून त्यांना बळ द्यावे, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष प्रा. दिपक पाटील यांनी मुख्यमंत्र्यांकडे निवेदनातून केली आहे.
निवेदनात असे म्हटले आहे, ग्रामीण भागात शिक्षणाच्या सोयी झाल्याने मुले-मुली उच्च शिक्षीत झाली. शिकलेल्या मुली लग्नासाठी नोकरी असलेल्या मुलांना प्राधान्य देतात. पण शिकून शेती व्यवसायात राहिलेल्या शेतकरी मुलांना लग्नासाठी मुली देण्याला कुणीही पुढे येत नसल्याचे चित्र निर्माण होत आहे. शेतकरी मुलांना लग्नासाठी वर्षानुवर्षे मुली बघण्यात घालावे लागत आहे. ३० ते ४० वर्षे उलटून गेली तरी काही युवक लग्न जुळविण्यासाठी धडपडत आहेत. लग्न ठरत नसल्याने या शेतकरी युवकांत नैराश्य, व्यसनाधीनता वाढत आहे. त्यामुळे त्याच्या कुटूंबावर परिणाम होत आहे. शासन नोकरदार, उद्योजकांना अनेक स्तरावर मदत करते. त्याप्रमाणे विवाह न झालेल्या तीस वर्षावरील अविवाहीत युवकांना शासनाने १० लाखाची आर्थिक मदत करुन आधार द्यावा.