जयप्रभा आंदोलन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जयप्रभा आंदोलन
जयप्रभा आंदोलन

जयप्रभा आंदोलन

sakal_logo
By

जयप्रभा स्टुडिओप्रश्नी
आंदोलन तीव्र करणार
आज छत्रपती शिवाजी चौकात ठिय्या
कोल्हापूर, ता. १७ ः जयप्रभा स्टुडिओ चित्रीकरणासाठी कायमस्वरुपी खुला व्हावा, या मागणीसाठी सलग ९४ व्या दिवशी आज साखळी उपोषण झाले. इतके दिवस आंदोलन सुरू असूनही दखल न घेतल्याने आता आंदोलन तीव्र करणार असून उद्या (बुधवारी) छत्रपती शिवाजी महाराज चौकात ठिय्या आंदोलन होणार असल्याचे चित्रपट महामंडळाचे उपाध्यक्ष धनाजी यमकर यांनी सांगितले.
गुरूवारी (ता.१९) सकाळी अकरा वाजता ताराराणी पुतळा येथे, शुक्रवारी (ता.२०) ऐतिहासिक बिंदू चौकात, शनिवारी (ता.२१) मिरजकर तिकटी येथे ठिय्या आंदोलन होईल. रविवारी (ता.२२) पंचगंगा घाट येथे अर्धनग्न ठिय्या आंदोलन केले जाणार आहे. सोमवारी (ता.२३) पालकमंत्री सतेज पाटील यांच्या कार्यालयासमोर आणि मंगळवारी (ता.२४) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्याचा निर्णय आज झालेल्या बैठकीत झाला. यावेळी महामंडळाचे संचालक रणजीत जाधव, सतीश बिडकर, दीपक महामुनी, सदाशिव पाटील, सुनील मुसळे आदी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y59083 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top