
भादवणमध्ये शैक्षणिक साहित्य वाटप
22662
भादवण (ता. आजरा) ः येथील आदर्श विद्यामंदिर प्रशालेत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करताना वीरमाता शेवंता शिवगंड व अन्य.
भादवणमध्ये शैक्षणिक साहित्य वाटप
भादवण : येथील शहीद जवान सखाराम मारुती शिवगंड यांच्या २६ व्या स्मृतीनिमित्त येथील आदर्श विद्यामंदिर प्रशालेत शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. देशसेवा बजावताना शहीद सखाराम शिवगंड यांना श्रीनगर येथील पालनपूर येथे वीरगती प्राप्त झाली होती. त्यांच्या स्मृती जपण्यासाठी त्यांच्या आई वीरमाता शेंवता मारुती शिवगंड या दरवर्षी प्रशालेत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करतात. यंदाही त्यांनी विद्यार्थ्यांना वही, पेन व अन्य शैक्षणिक साहित्यांचे वाटप केले. या वेळी मुख्याध्यापक जनार्दन रामचंद्र पाटील म्हणाले, ‘‘देशासाठी शिवगंड यांनी वीरगती मिळवली. देशसेवेसाठी त्यांनी दिलेले बलिदान आजही प्रेरणादायी आहे.’’ या वेळी शिवसेनेचे भादवण शाखा उपप्रमुख संदीप आनंदा सुतार, शाळा समिती अध्यक्ष काशिनाथ कुंभार, गिरीष सुतार, विनायक मोटे, तानाजी शंकर मोटे उपस्थित होते. विवेकानंद शामराव साबळे यांनी स्वागत केले. मुख्याध्यापक पाटील यांनी आभार मानले.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y59084 Txt Kopdist Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..