
नूतन बँकेवर प्रशासक
नूतन बँकेवर प्रशासक
इचलकरंजी, ता.१७ ः येथील शंकरराव पुजारी नूतन नागरी सहकारी बँकेवर शिरोळ तालुका सहाय्यक निबंधक प्रेमदास राठोड यांनी प्रशासक म्हणून काजकाज पाहण्यास सुरुवात केली आहे. दोन वर्षापासून बँकेची वित्तीय परिस्थीती डबघाईला आली होती. ठेवीदारांच्या ठेवी मुदतीनंतरही मिळत नव्हत्या. याबाबत अनेक ठेवीदारांनी तक्रारी केल्या होत्या. अखेर रिझर्व्ह बँकेने चार दिवसांपूर्वीच बँकेच्या आर्थिक व्यवहारावर निर्बंध घातले होते.
यानंतर सहकार विभागाकडून बँकेवर श्री. राठोड यांची प्रशासक म्हणून नियुक्ती केली आहे. सहा महिन्याच्या मुदतीसाठी ही नियुक्ती असून त्यांनी तातडीने पदभार घेवून कामकाजास सुरुवात केली आहे. बँकेची कर्जवसुली ठप्प आहे. बँकेचा एनपीए ७४ टक्के आहे. त्यामुळे कर्जवसुलीला गती देण्याबरोबरच बँकेला पुन्हा आर्थिक सुस्थीतीत आणण्याचे आव्हान त्यांच्यासमोर असणार आहे. बँकेची १९८६ मध्ये स्थापना झाली असून कोल्हापूर व सांगली जिल्ह्यात एकूण अकरा शाखा आहेत. ६७ कोटींच्या ठेवी व ६४ कोटींची कर्जे आहेत.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y59109 Txt Kopdist Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..