कदमवाडी- सत्कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कदमवाडी- सत्कार
कदमवाडी- सत्कार

कदमवाडी- सत्कार

sakal_logo
By

22537

शैलजा परमणे यांचा
सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार

कदमवाडी ः येथील माझी शाळेच्या शिक्षिका शैलजा परमणे यांचा शिवाजी विद्यापीठाचे माजी परीक्षा नियत्रंक डॉ. बी. एम. हिर्डेकर यांच्या हस्ते सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार झाला. अध्यक्षस्थानी सुंदर देसाई होते. सुसंस्कार शिक्षण मंडळाचे संस्थापक एम. एच. मगदूम, माझी शाळेच्या मुख्याध्यापिका अरुणा हुल्ले, मुख्याध्यापक विजय भोगम, रुबिना अन्सारी आदी उपस्थित होते. डॉ. हिर्डेकर म्हणाले, ‘‘सौ. परमणे यांच्यासारख्या सेवानिवृत्त शिक्षकांनी स्वत:ला विद्यार्थी प्रबोधन व ज्ञानधान क्षेत्रात स्वत:ला गुंतवून घ्यावे. तसेच सेवानिवृत्तीनंतर वंचित, दिव्यांग, प्रज्ञावंत, कमी गतीने शिकणाऱ्या, नापास मुलांसाठी तसेच ज्यांना मदतीची गरज आहे, अशा मुलांसाठी शनिवार- रविवार किंवा आठवड्यातून एखादा-दुसरा तास काम करावे.’’ प्रज्ञा पावसकर, सागर पाटील, हुल्ले, नंदकुमार डोईजड, भरत लाटकर, मगदूम, हसन देसाई यांनी मनोगत व्यक्त केले. शोभा कांबळे यांनी स्वागत केले. गुलाब अत्तार यांनी सूत्रसंचालन केले. योजना पवार यांनी आभार मानले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y59136 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top