हेरवाड ग्रामपंचायतीचे ग्रामविकास मंत्र्यांकडून अभिनंदन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

हेरवाड ग्रामपंचायतीचे ग्रामविकास मंत्र्यांकडून अभिनंदन
हेरवाड ग्रामपंचायतीचे ग्रामविकास मंत्र्यांकडून अभिनंदन

हेरवाड ग्रामपंचायतीचे ग्रामविकास मंत्र्यांकडून अभिनंदन

sakal_logo
By

हेरवाड ग्रामपंचायतीचे
ग्रामविकास मंत्र्यांकडून अभिनंदन

कोल्‍हापूर, ता. १८ : समाजात प्रचलित असलेली अनिष्ट प्रथा बंद करण्याचा ठराव ग्रामसभेत ठेऊन जिल्ह्याच्या हेरवाड ग्रामपंचायतीने विधवा प्रथा बंद केली.
आता अन्य ग्रामपंचायतींना प्रोत्साहित करणे आवश्यक आहे. पुरोगामी महाराष्ट्रात प्रागतिक विचाराचे स्वागत होणे महत्त्वाचे आहे. जुन्या बुरसटलेल्या प्रथा परंपराना विज्ञानवादी युगात स्थान असता कामा नये, असे सांगून हेरवाड ग्रामपंचायतीप्रमाणे राज्यातील अन्य ग्रामपंचायतीनी याचे अनुकरण करून तसा ठराव ग्रामसभेत करावा, असे आवाहन ग्रामविकास व कामगारमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. हेरवाड (ता. शिरोळ) ग्रामपंचायतीने ५ मे २०२२ रोजी विधवा प्रथा बंद करण्याचा ठराव केला. कुप्रथांचे पालन होत असल्याने अशा व्यक्तीच्या प्रतिष्ठेचे जीवन जगण्याच्या मानवी अधिकारांचे तसेच भारतीय संविधानाने बहाल केलेल्या समतेच्या हक्काचेही उल्लंघन होते. त्यामुळे अशा प्रथेचे निर्मूलन होणे ही काळाची गरज आहे. हेरवाड ग्रामपंचायतीने केलेल्या ठरावाप्रमाणेच अन्य ग्रामपंचायतींनी या निर्णयास आदर्श मानून समाजातील कुप्रथा बंद करून महिलांचे जीवन सुकर आणि आनंदी करण्याचे समाजोपयोगी निर्णय घ्यावेत, असे आवाहन मंत्री मुश्रीफ यांनी केले.
....

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y59159 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top